पोस्ट्स

DA/SPECIAL ALLOWANCE 1 January 2020 to 30 June 2020 REVISED SPECIAL ALLOWANCE MINIMUM WAGES CALC

कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत - Day 0 | Labour Codes 2025: Your Daily Decoder

कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत      Day 0 Labour Codes 2025: Your Daily Decoder कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत Day 0: हा दैनिक मालिका का वाचायला हवी? नमस्कार मित्रांनो, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सरकारने चार नवीन कामगार कायदे लागू केले. वर्तमानपत्रात, टीव्हीवर, सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. सरकार म्हणतं - "कामगारांसाठी मोठी सुविधा! ऐतिहासिक बदल!" पण प्रत्यक्षात काय बदललं? तुमच्यासाठी काय फायदा आहे? आणि कुठे सावध राहायला हवं? मी कोण आणि हा ब्लॉग मालिका का? मी एक स्वतंत्र ब्लॉगर आहे - कामगारमित्र . गेली अनेक वर्षे तुम्हाला किमान वेतन, ओव्हरटाईम, कामगार हक्क याबद्दल माहिती देत आहे. माझं काम आहे - तुम्हाला खरं सांगणं.  ना तारीफ  ना अंधाधुंद टीका  फक्त वस्तुस्थिती समस्या काय आहे? सरकारचा दावा आहे: "हे सर्व नवीन हक्क आम्ही दिले!" पण जेव्हा मी जुन्या कायद्यांशी तुलना केली, तेव्हा आढळलं: बरेच "नवीन" हक्क आधीच होते! फक्त नवीन पॅकिंगमध्ये दिले आहेत. उदाहरणे: दावा: "आता वेळेवर पगार मिळेल - हा नवीन हक्क!" व...

अंशकालीन सफाई कामगारांचे सर्व हक्क - वेतन, EPF/ESIC आणि तक्रार प्रक्रिया

 अंशकालीन सफाई कामगारांचे सर्व हक्क - वेतन,  EPF/ESIC आणि  तक्रार प्रक्रिया प्रश्न: “मी अंशकालीन सफाई कामगार आहे. माझे पगार, हक्क आणि सुरक्षा काय आहेत?” उत्तर: कामगारमित्राचे मार्गदर्शन:-  हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक अंशकालीन सफाई कामगार रोज मेहनत घेतात, पण त्यांना त्यांच्या हक्कांची पुरेशी माहिती नसते. खाली साध्या भाषेत सगळे मुद्दे दिले आहेत        १. अंशकालीन सफाई कामगार म्हणजे कोण? जे कामगार रोज ठराविक काही तास (उदा. २–४ तास) काम करतात, त्यांना अंशकालीन सफाई कामगार म्हणतात. ते ग्रामपंचायत, नगरपालिका, शाळा, सरकारी कार्यालय किंवा ठेकेदारामार्फत काम करतात.       २. नेमणूक आणि नोकरीतील सुरक्षा कामावर घेताना लेखी नियुक्तीपत्र (Appointment Letter) देणे आवश्यक आहे. कामगाराचे नाव स्थानिक संस्थेकडे नोंदवलेले असावे. वर्षानुवर्षे काम केल्यास स्थायीकरण (Regularisation) साठी अर्ज करता येतो. कोणत्याही कामगाराला अचानक काढून टाकणे योग्य नाही; आधी नोटीस आणि कारण सांगणे आवश्यक आहे.    ...

कामगारांनी तक्रार कुठे करावी? - संपूर्ण मार्गदर्शक

  कामगारांनी तक्रार कुठे करावी? – संपूर्ण मार्गदर्शक मित्रांनो, आपण कारखान्यात, दुकानात, बांधकामावर किंवा इतर कुठेही काम करत असाल – पण तुमचा पगार थांबला, सुट्टी नाकारली, छळ झाला तर तुम्ही काय कराल ? याचसाठी सरकारने कामगार कार्यालय (Labour Office) स्थापन केले आहे. हे कार्यालय कामगारांच्या तक्रारी कायद्याने सोडवते, जेणेकरून औद्योगिक वाद वाढू नयेत आणि कामगार–नियोक्ता यांच्यात सौहार्द टिकून राहावे. 🏢 कामगार कार्यालयाची गरज का आहे? कामगार कार्यालय खालील तक्रारींवर कारवाई करते: पगार न मिळणे / उशिरा मिळणे / किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळणे ओव्हरटाईमचे पैसे न देणे सुट्टी न देणे कामाचे असुरक्षित वातावरण महिला कामगारांवरील अन्याय / लैंगिक छळ नोकरीतून बेकायदेशीररीत्या काढून टाकणे बोनस, ग्रॅच्युइटी, पीएफ, ईएसआय न मिळणे 👉 तसेच, विशिष्ट गटांसाठी स्वतंत्र कायदे आहेत: बालकामगार, गर्भवती महिलांसाठी मातृत्व लाभ, श्रमिक पत्रकार, मोटार परिवहन कामगार, स्थलांतरीत कामगार, विक्री संवर्धन कामगार, इमारत व बांधकाम कामगार, कंत्राटी कामगार, बिडी–सिगार कामगार, वेठबिगार कामगार इ. 🌐 म...