--------------------------------------------------------------
किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी
(कामगार उपयुक्त , कामगार विभाग , महाराष्ट्र शासन ) यांचे द्वारा दर
सहा महिन्यांनी विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र
काढण्यात येते . १.१.२०२० ते ३०.६.२०२० या सहा महिन्यांकरिता विशेष
भात्याची दर सूचनापत्रात दिले आहे .
एखाद्या अनुसूचित उद्योगा करीता विशेष भत्ता हा तिन्ही परिमंडळासाठी
एकच राहतो जेंव्हा कि त्या उद्योगासाठीचे मूळ वेतन हे प्रत्येक
परिमंडळासाठी वेगवेगळे असतात. ग्रामपंचायतसाठी विशेष भात्याची
दर रक्कम ४०५०/- प्रति महिना दिली आहे.
किमान वेतन = मूळ वेतन +विशेष भत्ता
किमान वेतन हे मूळ वेतन व विशेष भत्ता जोडून काढलेली रक्कम आहे .
किमान वेतन प्रति महिना काढल्या जातो . यास आपल्याला प्रति दिवस
काढायचे असल्यास एकूण किमान वेतनास २६( कामाचे दिवस ) ने
भागावे. उदाहरणार्थ, परिमंडळ ३ ग्रामीण भागातील अकुशल ग्रामपंचायत
कामगाराचे किमान वेतन जानेवारी २०२० मध्ये नवीन विशेष भत्ता
(२०२०) अनुसार ५७२० रुपये महिना आहे . तर त्याचे प्रति दिवस
पगार ५७२० ÷ २६ = २२० रुपय प्रति दिवस एवढे राहील. प्रति दिवस
पगार २२० यास ८ (प्रति दिवस ८ तास काम ) ने भागल्यास प्रति
तास पगार काढता येतो . या उदा. २२० ÷ ८= २७.५ /- एवढे प्रति तास
पगार राहील.
* विशेष भत्ता(Special Allowance) यास डेअरनेस ऑलॉव्हन्स
(Dearness Allowance-DA ) किंवा महागाई भत्ता देखील म्हणतात .
**परिमंडळ १, २ , ३ याची माहिती दस्तावेज क्र. २ महाराष्ट्र शाषण
राजपत्र यात दिलेली आहे . तसेच कुशल , अर्धकुशल व अकुशल
कामगार म्हणजे काय ? याबाबत देखील महाराष्ट्र शाषण राजपत्र यात
नमूद केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा