पोस्ट्स

Labour Codes 2025 कामगार कायदे 2025 Worker Rights कामगार हक्क Labour Law Daily Series Maharashtra लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत - Day 0 | Labour Codes 2025: Your Daily Decoder

कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत      Day 0 Labour Codes 2025: Your Daily Decoder कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत Day 0: हा दैनिक मालिका का वाचायला हवी? नमस्कार मित्रांनो, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सरकारने चार नवीन कामगार कायदे लागू केले. वर्तमानपत्रात, टीव्हीवर, सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. सरकार म्हणतं - "कामगारांसाठी मोठी सुविधा! ऐतिहासिक बदल!" पण प्रत्यक्षात काय बदललं? तुमच्यासाठी काय फायदा आहे? आणि कुठे सावध राहायला हवं? मी कोण आणि हा ब्लॉग मालिका का? मी एक स्वतंत्र ब्लॉगर आहे - कामगारमित्र . गेली अनेक वर्षे तुम्हाला किमान वेतन, ओव्हरटाईम, कामगार हक्क याबद्दल माहिती देत आहे. माझं काम आहे - तुम्हाला खरं सांगणं.  ना तारीफ  ना अंधाधुंद टीका  फक्त वस्तुस्थिती समस्या काय आहे? सरकारचा दावा आहे: "हे सर्व नवीन हक्क आम्ही दिले!" पण जेव्हा मी जुन्या कायद्यांशी तुलना केली, तेव्हा आढळलं: बरेच "नवीन" हक्क आधीच होते! फक्त नवीन पॅकिंगमध्ये दिले आहेत. उदाहरणे: दावा: "आता वेळेवर पगार मिळेल - हा नवीन हक्क!" व...