नवीन १.१.२०२१ ते ३०.६.२०२१ सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र /DA/SPECIAL ALLOWANCE 1 JAN. 2021 - 30 JULY 2021

१.१.२०२१ ते ३०.६.२०२१ या सहा महिन्यांकरिता विशेष भत्ता  

नवीन सुधारीत विशेष भत्त्याची  रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र सक्षम प्राधिकारी यांच्या द्वारे दिनांक ५/२/२०२१ रोजी जाहीर करण्यात आला आहे परंतु प्रत स्पष्ट नसल्याने टंकलिखित माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले आहे . स्पष्ट प्रत प्राप्त होताच ती देखील पोस्ट केली जाईल .



 






------------------------------------------------------------------------------------------------



१.७.२०२० ते ३१.१२.२०२० या सहा महिन्यांकरिता विशेष भत्याची दर 

१ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२०  विशेष भत्त्याची  रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र .


             १.७.२०१९ ते ३१.१२.२०१९ या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर

वरील प्रत स्पष्ट नसल्याने त्यास  खंडित व मोठे करून सुलभ वाचनाकरिता खाली परत दाखविले आहे . 


१.७.२०२० ते ३१.१२.२०२० या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर



विशेष भत्ता /special allowance/DA-dearness allowance 

किमान वेतन खालील दोन दस्तावेजांच्या आधारे काढले जातात . ज्या उद्योगातील कामगारांना किमान वेतन लागू होतात त्या उद्योगांचे नाव दस्तावेज क्रमांक १ मध्ये वर दिसेल .

दस्तावेज क्र . १

 विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र .
किमान वेतन अधिनियम१९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी यांचे द्वारा दर सहा महिन्यांनी विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र  काढण्यात येते . 

दस्तावेज क्र . २ 

महाराष्ट्र शासन राजपत्र 

महाराष्ट्र शासन राजपत्रात वरील रकाना क्रमांक २ मधील प्रत्येक उद्योगांसाठी मूळ वेतन बाबत साधारणतः दर पाच वर्षांनी अधिसूचना प्रकाशित केली जाते. 

"किमान वेतन कसे काढावे/ किमान वेतन गणना कशी करावी ?" ही पोस्ट वाचल्यास आपणास या बाबत सविस्तर माहिती प्राप्त होऊ शकेल . वरील दोन्ही दस्तावेज आपल्याला जिल्ह्याती कामगार कार्यालयातून प्राप्त होऊ शकतात. तसेच किमान वेतनाबाबतचा तक्ता मालक/नियोक्ता/कंत्राटदार यास कामाच्या ठिकाणी लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सोबतच त्या क्षेत्राचे कामगार अधिकारी यांचे नाव व कार्यालयाचा पत्ता /दूरध्वनि क्रमांक सुद्धा लिहिणे अनिवार्य आहे . 


  • "पीसीएमसीने 469 कंत्राटी कामगारांच्या खात्यात 38 कोटी रुपये जमा केले आहेत" हे वाक्य  गूगल  सर्च वर  टाका व  www.esakal.com , www .dailykesari.com , mpcnews.in या सारख्या  इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रात हि बातमी मराठीत वाचा .  सदर बातमी कंत्राटी कामगारांच्या "सामान काम सामान वेतन " हक्काची बातमी आहे . 



टिप्पण्या

  1. या मध्ये अग्निशमन विभागतील (अग्निशामक( फायरमन), वाहन चालक चालक यंत्रचालक( ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ), टेलिफोन ऑपरेटर
    या पदाचा उल्लेख नाही या मध्ये आणि हे पदे कंत्राटी पध्दतीने भरली जात आहे व हे सर्व पदे टेक्निकल वर्गात मोडली जातात

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अक्षयजी किमान वेतन कायद्याअंतर्गत अनुसूचि मध्ये उद्योगाचे व कामधंदा यांचे नाव नमूद आहेत , पदांची नावे नमूद नाहीत त्यामुळे अग्निशामक( फायरमन), वाहन चालक चालक यंत्रचालक( ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ), टेलिफोन ऑपरेटर या पदाचा उल्लेख नाही. त्या अनुसूचित महानगरपालिका देखील एक उद्योग म्हणून नमूद आहे आणि महानगरपालिकेत जे कंत्राटदाराद्वारे कर्मचारी वेगवेगळ्या विभागातील रोजगारात काम करतात ते किमान वेतनास पात्र आहेत .

      अक्षयजी तुम्ही व तुमचे सहकर्मी महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आहात व तुम्हाला १०,७९५ रुपये प्रति
      महिना पगार आहे यावरून असे समजते की तुमच्या कंत्राटदाराची आस्थापना ही दुकाने व आस्थापना या अधिनियमाखाली नोंदीत असेल व तुम्हाला दुकाने व आस्थापना या परिशिष्ठातील उद्योगासाठी असलेले अकुशल कर्मचारीचे किमान वेतन देत आहे असे दिसून येते .
      दिनांक १. १. २०२० ते ३०. ६. २०२० पर्यंत परिमंडळ I,चे किमान वेतन कुशल- १२३८६ , अर्धकुशल- ११,६१०, अकुशल-१०७७५
      दिनांक १. ७. २०२० ते ३१.१२. २०२० पर्यंत परिमंडळ I, चे नवीन किमान वेतन कुशल- १२,५६८ , अर्धकुशल- ११,७९२, अकुशल-१०,९५७
      किमान वेतन २०२० दुकाने व आस्थापना या पोस्टात किमान वेतन बाबत सविस्तर पाहू शकता .

      अग्निशामक( फायरमन), वाहन चालक चालक यंत्रचालक( ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ), टेलिफोन ऑपरेटर ही सर्व पदे तांत्रिक आहे व कुशल कामगार ही कामे करतो . तेंव्हा आपण आपल्या कंत्राटदारास कुशल
      कामगारांचे वेतन देण्याची लिखित विनंती करा व ती विनंती अमान्य केल्यास आपल्या जिल्ह्यातील कामगार
      कार्यालयात न्याय मागा .

      हटवा
    2. धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बदल खूप आभारी आहे

      हटवा
    3. धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बदल खूप आभारी आहे

      हटवा
  2. सर मी टेक्सटाईल मध्ये काम
    करतो मला मिनीमम वेतन कीती असते
    ते समजेल का आमच्या ईथे काही लोकांना 25 वर्ष काम करून पगार
    12500 ते 14500 हजार आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. दिनांक १. ७. २०२० ते ३१.१२. २०२० पर्यंत यंत्रमाग उद्योगाचे परिमंडळ I चे नवीन किमान वेतन कुशल
      कामगार - १४,०१५ , अर्धकुशल कामगार - १३,४१५, अकुशल कामगार - १२,९१५ एवढे आहे . आपले किमान वेतन २५ वर्ष काम केल्यानंतर देखील जेमतेम किमानच आहे . आपण आपल्या पगारवाढीचा वाद आपल्या जिल्यातील सहायक कामगार आयुक्त यांचे कडे सादर करा व योग्य ती पगार वाढ मागणी करा .

      हटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. नवीन १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र हि पोस्ट पहा त्यातील पहिला रकाना अनुक्रमांक २० मध्ये ज्या कारखान्याची व्याख्या केली आहे त्यात पॉवर प्लान्ट / विज प्रकल्प , हे कारखाने उद्योगात मोडतात." कारखाने किमान वेतन २०२० " या पोस्ट मध्ये आपणास १.७. २०२० ते ३१. १२ २०२० पर्यन्तचे किमान वेतन मिळतील.

      हटवा
  4. Collam no20 madhe 525rs prati mahina ahe tr tyacha arth ky...tasech total month kiti midel

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ५२५ रुपये प्रति महिना विशेष भत्ता आहे यात मूळ वेतन बेरीज केल्यास आपल्याला आपले एकूण किमान वेतनाची रक्कम कळते .कृपया आपण कारखाने किमान वेतन २०२० या पोस्ट पहा त्या मध्ये आपणास १.७. २०२० ते ३१. १२ २०२० पर्यन्तचे कारखाने उद्योगातील किमान वेतन मिळतील.

      हटवा
  5. Grampachyatina kiman wetan wadale pan tyapeksha kami Nagarpanchayat karmcharyanna jhale ase ka?? Wahan Bhatt's gharbhade Bhatt's ITAR bhatte Nagarpanchayat employees na Lagu karanesati paripatrak pathwa pls

    उत्तर द्याहटवा
  6. हा विशेष भत्ता 1 जानेवारी 2020 पासून 30 जून 2020 आणि
    1 जुलै 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत आहेना ही वाढ 1 जानेवारी आणि 1जुलै ला लागू होते ना आमच्या कंपनीमध्ये ही वाढ 1 एप्रिल पासून आणि 1 ऑक्टोबर दिली जाते कंपनी म्हणते वर्ष 1एप्रिलपासून सुरू होते जुलै 2020 चा विशेष भत्ता की आहे

    उत्तर द्याहटवा
  7. जुलै 2020 चा विशेष भत्ता किती आहे

    उत्तर द्याहटवा
  8. सर, मी खाजगी कम्पनीत एका ठेकेदारकडे काम करतो, त्याला पगारवाढची मागणी केल्यास तो कामावरून कमी करण्याची धमकी देतो, काय करावे ?

    उत्तर द्याहटवा
  9. सर स्थानिक स्वराज्य संस्था (ग्राम पंचायत वगळून) या अनुसुचितीतिल रोजगाराचे किमान वेतन पुंनिर्धारीत करून पाच वर्षा पेक्षा अधिक कालावधी झाला आहे.त्यामुळे शासनाने किमान वेतन अधिनियम १९४७ मधील कलम ३ मधील तरतुद विचारात घेता या अनुसुचितील रोजगाराचे किमान वेतन शासन नियुक्त किमान वेतन सल्लागार मंडळाने पुंनिर्धारीत करणे अपेक्षित आहे. किती दिवस तेच मुळवेतन देण्यात येणार आहे आहे.वाढती महागाई विचारात घेता वाढ होणे अपेक्षित

    उत्तर द्याहटवा
  10. हॉस्पिटल मध्ये स्टाफ नर्स ( कंत्राटी परिचारिका व परिचारक) म्हूने 10 yrs पासून काम करत आहेत.17500 वेतन आहे त्यात कटिंग होवून 16500 हातात मिळत आहे तर आम्हला किती वेतन दिले पाहिजे याची माहिती मीलवी ही नम्र विनंती

    उत्तर द्याहटवा
  11. सर 1 जुलै 2021 पासून तर 31 डिसेंम्बर 2021 च नवीन DA काय आहे,

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 1 जुलै 2021 - 31 डिसेंबर 2021 चे विशेष भत्ता 4 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. लवकरच ब्लॉग वर छायाप्रत टाकण्याचा प्रयत्न होईल

      हटवा
  12. प्रत्युत्तरे
    1. 1 जुलै 2021 - 31 डिसेंबर 2021 चे विशेष भत्ता 4 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. लवकरच ब्लॉग वर छायाप्रत टाकण्याचा प्रयत्न होईल

      हटवा
  13. सर १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 1 जुलै 2021 - 31 डिसेंबर 2021 चे विशेष भत्ता 4 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. लवकरच ब्लॉग वर छायाप्रत टाकण्याचा प्रयत्न होईल

      हटवा
  14. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  15. सर 1 जुलै 2021 पासून तर 31 डिसेंम्बर 2021 च नवीन DA काय आहे,

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 1 जुलै 2021 - 31 डिसेंबर 2021 चे विशेष भत्ता 4 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. लवकरच ब्लॉग वर छायाप्रत टाकण्याचा प्रयत्न होईल

      हटवा
  16. सर आम्ही शासकीय कार्यालयात कंत्राटदारामार्फत रोजंदारीवर काम करतो, सहा महिण्यांनी जो विशेष भत्ता जाहिर केला जातो, तो GR वेळेवर लागू केला जात नाही, तर आम्हाला फरकाची रक्कम मिळु शकते का? त्यासाठी कोणाकडे मागणी करावी. व तसे देत नसल्यास काय करता येईल. तसेच आम्हाला 26 जानेवारी, 01 मे, 15 ऑगस्ट व 02 ऑक्टोंबर या दिवसांचा पगार मिळत नाही या बाबत काय करता येईल.

    उत्तर द्याहटवा
  17. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  18. Mi 6yr contractual staff nurse mhanun cantonment la Kam karte parantu mazi salary 17525/ aahe no increment tari minimum wages pramane mazi salary kiti aasayla pahije please guide me

    उत्तर द्याहटवा
  19. Sir aamchya ite CDET Explosive kampani talegaon (shya. Pant)dist .wardha.. kampani madhe ..sir Kam karnarya Mulan var thekedar aani kampani maynege ment mdhle don tin adhikarya kdn khub Shoshana hot aahe.. diwadicha Bonas ha fhkt 300 te 3500..itkach dentist yeto...aami ya kampani mdhe 9 te 10 yer pasn Kam krt aahe ...kampani malk he aamche bonce v pagar purn det aahe ...pn mdhle wekti aani thekedar aamchya parent purn pane det Nahi aahe tar ya thekedaran sobt ka karav ...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

किमान वेतन कसे काढावे? १.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.७.२०२२ ते ३१.१२.२०२२ ,MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other than VILLAGE PANCHAYAT)

KAMGAR MITRA किमान वेतन २०२० इमेजेस /MINIMUM WAGES 2020 IMAGES

किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१

किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES

Minimum Wages 1 January 2020 to 30 June 2020 REVISED SPECIAL ALLOWANCE and What to do when wages are not Paid for work done? Effect lockdown

किमान वेतन कारखाने २०२२ Maharashtra Minimum Wages 2022FACTORIES RESIDUAL (FACTORIES NOT COVERED UNDER SCHEDULE)

NEW DA/SPECIAL ALLOWANCE 1 JULY 2020 - 31 DEC. 2020

जब किए गए काम के लिए भी वेतन भुगतान नहीं किया जाता है तो क्या करें? लॉकडाउन का प्रभाव