KAMGAR MITRAकिमान वेतन ग्रामपंचायत २०२४ इमेजेस/MINIMUM WAGES IMAGES

कामगार मित्र  


कामगार /श्रमीक यांचेकरिता  त्यांच्या  कामासंबंधी कायदेविषयक माहिती ,शिक्षण व त्यांच्या विविध ज्वलंत समस्या व उपाय  त्यांवर  चर्चा ,कामगारांचे नेहेमीचे  प्रश्न  उदा. पगार /रोजी/वेतन  दिली नाही ,किंवा रोजी किमान वेतनापेक्षा कमी दिली , बोनस मिळाले नाही ,उपदान दिले नाही, कामावरून कारण नसताना कमी केले ईत्यादी ,यात  कायद्यानुषंगाने कामगारांनी काय करावे याची योग्य ती  माहिती आपल्या पर्यंत पोहोचोविण्याचे प्रयत्न आहे .


Kamgarmitra is a blog to provide workers' / labourers'/employees'   work-related legal information, to educate them regarding their legal rights and to discuss their various burning issues regarding nonpayment of salary/ wage/remuneration or nonpayment of wages according to minimum wages notified or workers did not get bonus/gratuity, or employee is terminated without fault, etc. This is a humble attempt to reach the hardworking, symbol of the dignity of labour with proper information about what the workers should do according to the law when they face the above issues.

विडिओ किमान वेतन २०२०-कृपया शेवटी पहा 

VIDEO MINIMUM WAGES 2020- Please see at the end




किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष 

भत्ता रु.२,९७६/-  १.७.२०२४ ते ३१.१२.२०२४




किमान वेतन २०२० इमेजेस /MINIMUM WAGES 2020 IMAGES


 












                        इंजिनीरिंग उद्योग किमान वेतन १.१.२०२० ते ३०.६.२०२० 


























विडिओ किमान वेतन 

VIDEO MINIMUM WAGES










  • "पीसीएमसीने 469 कंत्राटी कामगारांच्या खात्यात 38 कोटी रुपये जमा केले आहेत" हे वाक्य  गूगल  सर्च वर  टाका व  www.esakal.com , www .dailykesari.com , mpcnews.in या सारख्या  इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रात हि बातमी मराठीत वाचा .  सदर बातमी कंत्राटी कामगारांच्या "सामान काम सामान वेतन " हक्काची बातमी आहे . 


अर्ज केला परंतु अजूनपर्यंत त्या ऑफिस मधून काहीही 

उत्तर आले नाही? 


आपण कामगार / कर्मचारी  पंतप्रधान / मुख्यमंत्री / कामगार मंत्री / कामगार आयुक्त यांच्याकडे ऑनलाइन तक्रार करू शकतात.

"आपले सरकार "या वेबसाइट वर तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रार निवारण मंच दिले आहे .त्याबाबत  संकेतस्थळ /वेबसाईट साठी येथे क्लिक करा  . येथे आपल्या तक्रारी संदर्भात  सक्षम अधिकारी यांचा आपली तक्रार २१ दिवसात निवारण करण्याचा प्रयत्न असेल.आपण वेळोवेळी आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करू शकता . 

निळ्या रंगाच्या पंक्तीत आपण संकेतस्थळाचा  वापर कसा करायचा त्या करीता वापरकर्ता पुस्तिका दिली आहे, तसेच आपल्याला या संकेतस्थळाचा वापर करतांना पडणारे नेहेमीचे प्रश्न व त्याचे उत्तर देखील दिले आहे . 



या संकेतस्थळावर तक्रारकरतेवेळी आपण या आधी काय काय प्रयत्न केले त्याबाबत देखील नमूद करा आपणास स्थानिक पातळीवरील कार्यालयाकडून मार्गदर्शन प्राप्त होत नसल्याने आपण येथे तक्रार प्रस्तुत ल केली असे ही अवगत करून द्यावे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


  • १२  जून, २०२० के  सुप्रीम कोर्ट के निर्देश के बारे में हिंदी ख़बरों के लिए यहां क्लिक करें "लॉकडाउन के दौरान पूरा वेतन नहीं देनी वाली निजी कंपनियों के खिलाफ जुलाई तक कोई कार्रवाई न की जाए: सुप्रीम कोर्ट"  दिप्रिंट की इस खबर में बताया गया है की  सुप्रीम कोर्ट ने कहा है कि उद्योगों और श्रमिकों को एक दूसरे की जरूरत है और उन्हें पारिश्रमिक के भुगतान का मुद्दा एक साथ बैठकर सुलझाना चाहिए  और राज्य सरकारों से कहा कि वे इस तरह के समाधान की प्रक्रिया की सुविधा मुहैया करायें और इस बारे में संबंधित श्रमायुक्त के यहां अपनी रिपोर्ट पेश करें.केन्द्र ने  29 मार्च के निर्देशों को सही ठहराते हुये कहा था कि अपने कर्मचारियों और श्रमिकों को पूरा भुगतान करने में असमर्थ निजी प्रतिष्ठानों को अपनी ऑडिट की गयी बैंलेंस शीट और खाते न्यायालय में पेश करने का आदेश दिया जाना चाहिए.  दिप्रिंट  की  खबर में  शीर्ष अदालत के  फैसले की और  भी महत्वपूर्ण जानकारी दी है। वर्तमान परिस्थितियों में नियोक्ताओं और श्रमिकों के बीच बातचीत से इन 54 दिनों के वेतन के भुगतान का समाधान खोजने की आवश्यकता पर सर्वोच्च न्यायालय ने जोर दिया है ऐसा दिप्रिंट  की खबर में दिया है


  • "पीसीएमसीने 469 कंत्राटी कामगारांच्या खात्यात 38 कोटी रुपये जमा केले आहेत" हे वाक्य  गूगल  सर्च वर  टाका व  www.esakal.com, www.dailykesari.com ,mpcnews.in या सारख्या  इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रात हि बातमी मराठीत वाचा .  सदर बातमी कंत्राटी कामगारांच्या "सामान काम सामान वेतन " हक्काची बातमी आहे . 


टिप्पण्या

  1. नमस्कार, माथाडी कामगार बद्दल पण माहिती विचारू शकतो का.

    उत्तर द्याहटवा
  2. मी एका निमशासकीय अनुदानित महाविद्यलयात गेली सात वर्ष कंत्राटी लिपिक म्हणून कामाला आहे तर मला किमान वेतन कायदा लागू होतो का??

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो आपल्याला किमान वेतन कायदा लागू होतो .

      “…application for minimum wages were filed are non-else but junior clerk, peon, mali, maidservant and rickshaw-pullers. Admittedly, these employees are doing unskilled, semi-skilled, or skilled work. The employees of these categories working in the employment of any educational institution certainly comes within the purview of the Act and they are entitled to get minimum wages time to time fixed under the Act-“

      Chacha Nehru Vidyapith vs Authority Under Minimum Wages ... on 31 January, 2001 ह्या केस मध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि जे कर्मचारी लिपिक, शिपाई, माळी,इत्यादी कुशल अर्धकुशल किंवा अकुशल काम करतात त्यांना किमान वेतन कायदा लागू होतो . किमान वेतन कायदा हा शिक्षण संस्थेतील शिक्षकांना लागू होत नाही परंतु तेथील लिपिक ,कंत्राटी कर्मचारी /कर्मचारी जे लिपिक, शिपाई, माळी,इत्यादी कामे करतात त्यांना लागू होतो .

      Chacha Nehru Vidyapith vs Authority Under Minimum Wages ... on 31 January, 2001 सदर न्यायालयीन आदेश वाचण्याकरिता येथे क्लिक करा

      हटवा
    2. Chacha Nehru Vidyapith vs Authority Under Minimum Wages ... on 31 January, 2001 सदर लिंक येथे सक्रिय नसल्याने कृपया लिंक वरती पोस्टच्या शेवटी पाहावे .


      .

      हटवा
  3. हा कायदा लागू होण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल ??

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण आपल्या कंत्राटदारास किंवा आपले कंत्राटदार स्वतः शिक्षणसंस्था असल्यास आपल्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्य/प्रमुख यांना पत्राद्वारे किमान वेतन अधिनियम १९४८ अनुषंगाने आपणास दुकाने व आस्थापना या अनुसूचित उद्योगातील कुशल कामगाराचे किमान वेतन कायद्या प्रमाणे देणात यावे असे विनंती पत्र लिहावे.आपले कामाचे ठिकाणे कोणत्या परिमंडळात मोडतो हे बघा व ती रक्कम वेतन म्हणून देण्यास विनंती करा . पंधरा दिवसात काही उत्तर न दिल्यास किंवा किमान वेतन देत नसल्याचे उत्तर दिल्यास आपण आपल्या जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकारी , कामगार विभाग यांना किमान वेतन मिळवून द्यावे असे विनंती पत्र लिहा .


      अनुसूचित उद्योग, परिमंडळ, कुशल यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी हि पोस्ट वाचा :
      १. किमान वेतन दुकाने व आस्थापना SHOP AND ESTABLISHMENT'S MINIMUM WAGES FROM
      1 January 2020 to 31 June 2020 REVISED SPECIAL ALLOWANCE
      २. किमान वेतन कसे काढावे? १.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता

      हटवा
  4. धन्यवाद असेच आपले सहकार्य मिळेल हि अपेक्षा व्यक्त करतो ..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण आपले प्रश्न येथे उपस्थित करून इतर वाचकांसाठी देखील माहिती उपलब्ध करून दिली आहे . आपण कामाबाबत कोणतीही समस्या निर्माण झाल्यास निसंकोचपणे विचारावे.

      हटवा
  5. Mi grampanchayat karmachari ahe pan mala grampanchayat rahniman bhatta milt nahi to milel ka

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण ग्रामपंचायत या अनुसूचित उद्योगात अकुशल/अर्धकुशल/कुशल कोणत्या श्रेणी व परिमंडळात मोडता व आपले किमान वेतन हे मूळ वेतन अधिक विशेष भत्ता याची बेरीज करून आलेली एकूण रक्कम अवढी आहे का ते पहा . जर आपले एकूण वेतन हे वरील प्रमाणे असेल तर आपले वेतन कायद्या प्रमाणे आहे . उदा .परिमंडळ १ येथील कुशल कर्मचारी याचे मूळ वेतन २२७०+ ४०५० विशेष भत्ता=एकूण रक्कम ६३२० रुपये हे किमान वेतन आहे . या कुशल कामगारास हि किमान वेतनाची एकूण रक्कम, ४२७०मूळ वेतन+२०५०विशेष भत्ता या प्रमाणे देत असल्यास देखील किमान वेतन हे कायद्याप्रमाणेच ६३२० रुपये आहे .

      जर आपणास मिळत असलेले वेतन हे एकूण रक्कमेपेक्षा म्हणजे किमान वेतनापेक्षा कमी मिळत आहे तर आपण त्या विषयी आपल्या ग्रामसचिव यांना पत्र लिहून किमान वेतन देण्याचे विंनंती करावी .जर ग्रामपंचायत कडून तुमची विनंती अमान्य करण्यात आली तर आपण जिल्हा कामगार कार्यालयात सरकारी कामगार अधिकारी यांना किमान वेतन मिळवून देण्याचे विनंती पत्र लिहावे . किमान वेतन देरापेक्षा कमी वेतन देणे हा गुन्हा आहे .

      हटवा
  6. आम्ही एका टेक्सटाईल कंपनी मध्ये 1996 पासून कामगार (टेक्निशियन) म्हणून कार्यरत आहो, एप्रिल2013 ला कंपनी ने आम्हाला प्रमोशन लेटर दिले व स्टाफ मध्ये घेतले,2016 पासून कंपनीने आम्हाला इन्क्रीमेंट देने बंद केले,आता lockdown मध्ये 24 मार्च2020 पासून कंपनी बंद आहे 2 मे कंपनी ने अनिश्चित कालावधी साठी बंद चा नोटीस लावला व एप्रिल महिन्याचे वेतन सुद्धा दिले नाही व आता राजीनामा द्यावा यासाठी कंपनी प्रेशर टाकत आहे, आम्ही 40 लोक आहोत ,आम्हाला कुठे मिळू शकते याबद्दल मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण आपल्या जिल्ह्यातील कामगार कार्यालय येथे दाद मागावी . कोणत्याही दबावात निर्णय घेऊ नका . तुम्ही कंपनीत अंदाजे २४ वर्ष काम केले या दरम्यान तुम्हाला कम्पनी ने खालील प्रमाणे कायदेशीर तरतुदीनुसार -

      किमान वेतन दिले काय ?

      अतिरिक्त कामाचे दुप्पट वेतन दिले काय ?

      नियमा प्रमाणे बोनस दिले काय ?

      सामान्यत: सशुल्क रजेचा हक्क आहे काय?

      इन्क्रीमेंट नियमित दिले काय?

      मागील तीन-चार वर्षात कम्पनी फायद्यात होती काय ?

      कम्पनी फायद्यात कधी तुम्हाला काही आर्थिक वृद्धी मिळाली काय ?

      वरील मुद्दे व इतर मुद्दे जे आपण आपल्या प्रश्नात मांडले ते सविस्तर एका अर्जात लिहावे व आपल्या जिल्ह्याचे कामगार कार्यालयातील सहायक कामगार आयुक्त यांना मार्गदर्शनाची विंनती करावी . न्यायालया सारखेच कामगार कार्यालयातील अधिकारी देखील आपल्याला कोरोना मुळे कम्पनी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगतील तेंव्हा तुम्हाला वर उल्लेखित मुद्दे वाटाघाटीसाठी कामी पडतील .
      वरील तरतुदींचे पालन या २४ वर्षात कम्पनी ने किती केले हे सर्व कामगारांना माहित आहे . २४ वर्षां पासून तुम्ही या कम्पनीला जिवंत ठेवले मालकास फायदा करून दिला परंतु आपला मालक आपल्या एक महिन्याचा पगार सुद्धा आणीबाणीच्या वेळेस शासनाच्या निर्देशानुसार देऊ शकत नाही असे तुम्हाला वाटते काय?

      असो , वरील कायद्याच्या तरतुदी ज्या त्याने २४ वर्षात मोडल्या त्याचा जर हिशोब लावला तर किती पटीने त्याला दंड बसला असता व तुम्हाला दाव्याची रक्कम मिळाली असती हा अंदाज हि तुम्हाला नसेल . कामगार किमान वेतन पेक्षा कमी वेतनात , ओव्हर टाईमचे पण दर न घेता काम करतो , कित्येक वर्ष किमान वेतन मिळत नाही त्याला ,त्याचे नाव पण कुठे नोंदणी पुस्तकात नसते, त्याचे शोषण कामगार कायदे असतांना सुद्धा होतात . मग विचार करा शासन जे कामगार कायदे कमी करण्याचे ,बदलण्याचे , कामगारांचे आर्थिक व आरोग्य सुरक्षा संपवण्याचे प्रयत्न करीत आहेत, काय शासनाच्या या प्रयत्नांची चाचपणी करणे गरजेचे नाही का ?

      हटवा
  7. आता आम्हाला न्याय कुठे मिळू शकते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या जिल्ह्याचे कामगार कार्यालयातील सहायक कामगार आयुक्त यांना आपल्या समस्याचे निवारण करण्यास अर्ज करा .

      हटवा
  8. अर्ज केला परंतु अजूनपर्यंत त्या ऑफिस मधून काहीही उत्तर आले

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. "आपले सरकार "या वेबसाइट वर तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रार निवारण मंच दिले आहे .त्याबाबत वरती पोस्ट मध्ये सविस्तर माहिती व संकेतस्थळ /वेबसाईट देत आहे . येथे आपल्या तक्रारी संदर्भात सक्षम अधिकारी यांचा आपली तक्रार २१ दिवसात निवारण करण्याचा प्रयत्न असेल.आपण वेळोवेळी आपल्या तक्रारिचा पाठपुरावा करू शकता .

      हटवा
  9. Sar amhi pasuswardhn antargat akola Vikas mahamndal mdhe ni niyukt kelelya thekedar tarfe(55 kamgar ) ahot
    kam krto pn magil 8mhinya pasun amhala pagar paripatrak /esi/pf kahili varnvar lekhi arj deunhi deli nahi amchi 8mhinyache (pf ha budun jail ) ani amche arthik shoshn hoty k apn khi tri marg dakhvava
    Amchya kd sagle kagt patr ahe


    88050444558 help me

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण लवकर पिएफ कार्यालयात आपली तक्रार नोंद करावी .पिएफ कायदा हा फार कठोर आहे व ते योग्य कारवाई करतील . आपण पगार न मिळाल्याची तक्रार आपले जिल्ह्यातील कामगार कार्यालयात करा .

      हटवा
  10. सर आम्ही टेक्सटाईल मध्ये 1998
    पासुन काम करतो पण मालक काही
    लोकांना अजून 12500 ते 14500
    पगार देतो आम्हाला कीमान वेतन कीती
    असते ते समजेल का आणि आम्ही काय करावे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कृपया ही पोस्ट बघा " किमान वेतन २०२० यंत्रमाग उद्योग व हातमाग उद्योग MINIMUM WAGES 2020 POWERLOOM INDUSTRY & HANDLOOM INDUSTRY" . दिनांक १. ७. २०२० ते ३१.१२. २०२० पर्यंत यंत्रमाग उद्योगाचे परिमंडळ I चे नवीन किमान वेतन कुशल कामगार - १४,०१५ , अर्धकुशल कामगार - १३,४१५, अकुशल कामगार - १२,९१५ एवढे आहे . आपले किमान वेतन २५ वर्ष काम केल्यानंतर देखील जेमतेम किमानच आहे . आपण आपल्या पगारवाढीचा वाद आपल्या जिल्यातील सहायक कामगार आयुक्त यांचे कडे सादर करा व योग्य ती पगार वाढ मागणी करा .

      हटवा
  11. सर टेक्सटाईल पावर लुम
    मध्ये साधारण बेसिक आणि डिए
    कीती असते नाशिक

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कृपया ही पोस्ट बघा " किमान वेतन २०२० यंत्रमाग उद्योग व हातमाग उद्योग MINIMUM WAGES 2020 POWERLOOM INDUSTRY & HANDLOOM INDUSTRY"

      हटवा
  12. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ येथे रोजंदारी तत्वावर 10 ते 12 वर्षा पासून काम करत आहो आम्हाला किमान वेतन कायदा लागू होतो का आणि कोणता व आम्ही त्या साठी काय करायला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  13. आम्हि महानगर पालिकेत कंञाटि कर्मचारी म्हणुन काम करतोत..पण दर सहा महिन्यला स्थायी समीती ची मंजुरी विना आम्हाला ६महिन्याची मुदतवाढ मिळत नाहि...,तसेच काहि नगर सेवकांचे चुकीचे काम नाहि केले तर आम्हाला स्थियी स. मध्ये मुदतवाढिस आढथळा निर्मार्ण करतात...,यावर काहि उपाय सुचवावे

    उत्तर द्याहटवा
  14. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  15. Namskaar mi thane mahanagar palika ghan kachra vyavastapak vibhaga madhe kantrati kaamgaar aahe amhi helper mhannun karyarat aahot amhala ajun 2 varshapasun kimaan vetan milal nahi v sangitl nahi ayuct upayucta kade takraar hi ke tari pan fact ashvasan pudhe aamhi kay karav?

    उत्तर द्याहटवा
  16. महानगरपालिकेने आरोग्य विभागात जे कायम कर्मचारी जे शासकीय सुट्या उदा.सण,जयंती,मिडिकल, सुट्ट्या घेतात ते लाभ कंत्राटी कामगार याना सुद्धा आहे का

    उत्तर द्याहटवा
  17. सर मी नगर परिषद दिग्रस मध्ये गेली 22 वर्षा पासुन कंत्राट मध्ये आरोग्य विभागात सफाई चे काम करते माझीच नाही तर नगर परिषद मधील कोणत्याही कामगाराना किमान वेतन,ईपिफ,ईएस आय,किंवा कामगार कायद्याच्या कोणत्याही सुविधा मिळत नाही आणी हजरी घेतली जात नाही,संस्था आपल्याच कामगाराच्या नावे सर्व सुविधा दाखवतात आणी बिल काढुन घेतात खुप तक्रारी केल्या परंतु काहीही फरक पडला नाही उलट कामगाराना अधिकारीच कामावरुन कमी करतात काय कराव?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

किमान वेतन कसे काढावे? २०२४ विशेष भत्ता ,मूळ वेतन

२०२४ सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र /DA/SPECIAL ALLOWANCE 2024

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून)१.७.२०२४ ते ३१.१२.२०२४ ,MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other than VILLAGE PANCHAYAT)

किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१

किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES

How To calculate Minimum Wages in India.

किमान वेतन कारखाने २०२४ Maharashtra Minimum Wages 2024FACTORIES RESIDUAL (FACTORIES NOT COVERED UNDER SCHEDULE)

किमान वेतन २०२४ डिसेंबर पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२४, विशेष भत्ता २०२४ NEW DA/SPECIAL ALLOWANCE 2024

जब किए गए काम के लिए भी वेतन भुगतान नहीं किया जाता है तो क्या करें? लॉकडाउन का प्रभाव