किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES
किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय
फेसीलीटी पगारात जमा होतात ?
विविध भत्ते/ ALLOWANCES
1.House Rent Allowance (HRA)/ घर भाडे भत्ता :-
महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम, १९८३ अंतर्गत महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्या आस्थापनेतील कामगारांना (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो .
१. खालील संकेतस्थळांवर आपणास घरभाडेभत्ता या विषयावर काही माहिती मिळेल
- http://prakashchavan00.blogspot.com/p/blog-page_955.html
- https://adf.maharashtra.etenders.in/viewpages/tendernoticedisplay.asp?
- https://m.dailyhunt.in/news/india/marathi/arthasakshar-epaper-artasr/gharabhade+bhatta+hra+sambadhit+kahi+mahatvachya+shanka+v+tyachi+uttare-newsid-91001110
- https://mahakamgar.maharashtra.gov.in/lc-maharashtra-workmens-minimum-house- rent- allowance-mr.htm
खालील मजकूर लिहिला आहे .आपणास येथे सर्व कामगार कायदे बघता येतील.
"दिनांक २६ डिसेंबर १९९० रोजी महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्याद्वारे राज्यातील सर्व उद्योगांना व कारखान्यांना महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम, १९१३ च्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. हा अधिनियम राज्यातील सर्व औद्योगिक कामगारांना रु.२०/- किंवा एकूण वेतनाच्या ५% या दराने किमान घरभाडे भत्ता देण्याच्या तरतुदी करतो. ज्या कारखान्यांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये ५० पेक्षा अधिक कामगार कामावर ठेवण्यात आलेले असतील, अशा सर्व कारखान्यांना किंवा आस्थापनांना हा अधिनियम लागू आहे. अधिनियमातील तरतुदी दिनांक २१ जानेवारी १९९१ पासून लागू करण्यात आलेल्या आहेत."
३. https://adf.maharashtra.etenders.in/viewpages/tendernoticedisplay.asp? या सारख्या शासनाच्या कोणतेही टेंडर बघितल्यास त्यात तुम्हाला किमान वेतन, घरभाडे भत्ता , भरपगारी राजा इत्यादी अटी कामगार कायद्याअंतर्गत पूर्ण करायचे बंधन दिसेल .
४.तसेच https://www.pcmcindia.gov.in/circular-details.php?id=54 या संकेतस्थळावर आपल्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कंत्राटी कामगारांना घरभाडे व्यतिरिक्त इतर काय कायदेशीर देणी दिली आहेत हे बघायला मिळेल .
2. Leave with Wages /भरपगारी रजा:-
मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ अंतर्गत तरतुदीनुसार वर्षातून २४० दिवस काम करणाऱ्या कामगाराला २१ दिवसाची भरपगारी राजा मिळाली पाहिजे .भरपगारी रजा ४२ दिवसांपर्यंत जमा करता येतात.
कारखाने अधिनियम, १९४८ अंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व आस्थापनांत / उद्योगांत / कारखान्यांत/ रोजगारांत जर कामगाराने/कर्मचाऱ्याने वर्षात २४० दिवस काम केले असेल तर तो दर 20 दिवसाच्या कामवर एक दिवसाची सवेतन रजे साठी पात्र असेल . कंत्राटी कर्मचारी सवेतन रजेसाठी पात्र आहेत.
कारखाना, खाण, व्यावसायिक आस्थापना किंवा मळा व्यवसाय निगडित विविध कायद्यांतर्गत भरपगारी रजेची तरतुदी आहेत .
मुंबई दुकाने व संस्था अधिनियम, १९४८ आता महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ ह्या कायद्यानुसार हे अधिनियम आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून यामध्ये शहरातील , एम.आय.डीसी. भागातील व ग्रामीण भागातील -
-दुकाने,
-निवाशी हॉटेल,
-धाबा,
-उपहारगृह,
-खाद्यगृह,
-थिएटर किंवा
-सार्वजनिक मनोरंजनाची जागा स्थापना,
-कोणतेही उद्योग, उत्पादन कार्य किंवा बँकीग, विमा रोखे व भाग (शेअर्स) दलाली किंवा उत्पन्न विनियम याबाबतचा व्यवसाय किंवा पेशा अथवा कोणताही धंदा उद्दीम किंवा उत्पादन कार्य यांच्याशी संबंधित किंवा त्यास अनुषंगिक अथवा सहाय्यभूत असे कोणतेही काम करणारी आस्थापना,
-वैद्यक व्यवसायी (हॉस्पिटल, दवाखाना, चिकित्सालय प्रसतीगृह)
-वास्तुशास्त्राच्या, अभियंत्याच्या सल्लागाराच्या आस्थापना,
-सोसायटी व तिच्याशी अनुषंगिक किंवा सहाय्यभूत असलेला कोणताही धंदा, उद्दीम किंवा व्यवसाय
-तसेच त्या सर्व आस्थापना ज्यांना कारखाने अधिनियम १९८४ यांच्या तरतुदी लागू होत नाहीत, त्या सर्व आस्थापनांचा समावेश होतो .
तेंव्हा भरपगारी रजा ही वरील सर्वांना लागू होईल
- दुकाने व आस्थापना कायद्यानुसार कर्मचार्यांना रजा देण्याची तरतूद आहे. प्रत्येक राज्यात ह्या कायद्यातील तरतुदी वेगळ्या आहेत.
3.Leave Encashment रजा नकदीकरण:-
कारखाना कायद्यांतर्गत कामगार सेवेत असताना रजा नकदीकरण उल्लेख नाही, जर व्यवस्थापनाने संमती दिली तरी ही नाही . परंतु कारखाना कायद्यांतर्गत सेवा सोडताना, सेवानिवृत्ती, डिस्चार्ज/मुक्त केल्यास, डिसमिस/बडतर्फ कले किंवा मृत्यू झाल्यास कर्मचार्यांना रजा नकदीकरण घेता येतो. रजेचे एन्कॅशमेंट/नकदीकरण कर्मचार्यांच्या सरासरी दैनंदिन वेतनमानानुसार असले पाहिजे.
4. Over Time Allowance जादा कामाचा मोबदल/अतिकालिक कामाचे तासच्या/ अतिरिक्त तास काम करण्यासाठी जादा कामाचा भत्ता:-
नियोकत्यास जेव्हा कामकाजाच्या वेळेस सामान्य कामाव्यतिरिक्त अत्यंत अल्प वेळात जास्त काम करण्याची आवश्यकता भासते तेव्हा नियोक्ता कर्मचार्यांना कामाच्या तासांनंतर ओव्हरटाइम/अतिरिक्त काम देऊ करतो . जेव्हा कर्मचारी ओव्हरटाइम काम करतात तेव्हा ती त्यांची अतिरिक्त कामस स्वीकृतीच समजल्या जाते ,अशा प्रकारे नियोक्ता व कर्मचारी यांच्यात (निष्कर्ष काढलेल्या) निहित करारचे उदय होते व कर्मचार्यांना कामाच्या तासांनंतर ओव्हरटाइम/अतिरिक्त तास काम करण्यासाठी अतिरिक्त/ जादा कामाचा भत्ता द्यावा लागतो . उदाहरणार्थ आठ तास कामकेल्यावर जर कर्मचाऱ्याने दोन तास अतिरिक्त /जादा काम का केले असेल त्यास चार तासाचा मोबदला द्यावा लागेल .
Minimum Wages Act, 1948/किमान वेतन कायदा, 1948 ओव्हरटाइम वेतन कामगारांच्या पगाराच्या सामान्य दरपेक्षा दुप्पट दराने द्यायचे आहे.
Factories Act, 1948/कारखाना कायदा, 1948 मध्ये ओव्हरटाईम बाबत तरतुदी आहेत त्यानुसार अतिरिक्त कामकेल्यास कामगारास सामान्य वेतनाच्या दुप्पट दराने वेतन मिळण्याचा हक्क आहे .
Contract Labour (Regulation & Abolition) Act, 1970/कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम,१९७० प्रत्येक कंत्राटदाराने फॉर्म XXIII मध्ये ओव्हरटाइम रजिस्टर ठेवणे अनिवार्य आहे ज्यामध्ये ओव्हरटाइम गणना, अतिरिक्त कामाचे तास, कर्मचार्यांचे नाव इत्यादी सर्व तपशील असतील.Building and Other Construction Workers (Regulation of Employment Service) Act, 1996/इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार सेवेचे नियमन) कायदा, १९९६,ओव्हरटाईम काम करणाऱ्या कामगारास सामान्य वेतनाच्या दुप्पट दराने ओव्हरटाईम वेतन दिले जाईल.
खालील नमूद कायद्यात जादा कामाचा मोबदल्याबाबत तरतुदी आहेत .Mines Act, 1952/खाण कायदा, 1952Bidi and Cigar Workers (Conditions of Employment) Act, 1966/बिडी आणि सिगार कामगार (रोजगार अटी) कायदा 1966
Working Journalist (Conditions of Service) and Miscellaneous Provisions Act, 1955/श्रमिक पत्रकार व अन्य वृत्तपत्रकार कर्मचारी (सेवाशर्ती ) आणि संकीर्ण तरतूदी अधिनियम, १९५५.Plantation Labour Act, 1951/मळा कामगार कायदा 1951
6.Transport allowance /वाहतूक भत्ता:-
वाहतुक भत्ता म्हणजे कार्यालयीन कर्तव्याच्या कामकाजाच्या वाहतुकीवरील खर्च भागविण्यासाठी दिलेला भत्ता.सर्वसाधारणपणे मालवाहतूक वाहतुकीची सुविधा नसल्यासच वाहतुक भत्ता दिले जाते.सर्वसाधारणपणे परिवहन भत्ता म्हणजे वाहतुकीच्या उद्देशाने प्रदान केलेला भत्ता.तथापि, आयकर कायदा १९६१ च्या कलम १० (१४)) अन्वये व आयकर नियमांच्या 2 बीबी सह वाचला असता वाहतूक भत्ता, म्हणजे खालील पैकी एक असतो-
- एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचे निवासस्थान आणि कार्यालय / कर्तव्य स्थान दरम्यान प्रवास करण्याच्या उद्देशाने त्याचा खर्च भागविण्यासाठीचा भत्ता
- वाहतूक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला, जर त्या कर्मचारीस दैनंदिन भत्ता मिळत नसेल तर अशा प्रकारच्या वाहतुकीचे काम बजावताना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी चालविण्याच्या कर्तव्याच्या वेळी केल्या गेलेल्या वैयक्तिक खर्च पूर्ण करण्यासाठी दिलेला भत्ता,
सुट्टीवर प्रवास केल्याबद्दल कर्मचार्यास त्याच्या मालकाकडून मिळालेला भत्ता / सहाय्य.
रजा प्रवास सवलत ही सूट आहे.
8. Medical Allowance वैद्यकीय भत्ता
.
9.Sick leave and Sick Pay:- रुग्णता रजा व पगार
‘कर्मचारी राज्य विमा कायदा १९४८ अंतर्गत समाविष्ट कामगारांना रुग्णता रजेत पगाराचा हक्क आहे, परंतु संघटित कामगार जे की थोड्या प्रमाणात आहेत फक्त तेच ह्या सामाजिक सुरक्षा कायद्याने समाविष्ट आहे. .
10.Performance Bonus कामगिरी भत्ता
11. Food /Meal Allowance /अन्न भत्ता:-
12.Children Education Allowance( CEA )बाल शिक्षण भत्ता
13.Night Shift/Heat/Gas & Dust Allowance
14.Tiffin/Food/Milk/Lunch allowance/ टिफिन / अन्न / दूध / दुपारच्या जेवणाचा भत्ता म्हणजेच कॅन्टीन अनुदान / अन्न अनुदान . सदर भत्ता कर्मचारी अनुपस्थित आहे किंवा अधिकृत रजेवर आहे याची पर्वा न करता. एका निश्चित दरावर रोख रकमेचा भरणा मालकाकडून केल्या जातो .
15.City compensatory allowance शहर भरपाई भत्ता
16.Mobile allowance मोबाइल भत्ता
17.Attendance allowance उपस्थिती भत्ता
18. इतर भत्ते
- Uniform allowance/गणवेश भत्ता आणि Washing Allowance /धुण्याचे भत्तारोजगाराच्या स्वरूपामुळे घेतलेल्या विशेष खर्चाची भरपाई करण्यासाठी ही रक्कम दिली जाते.
- यामध्ये नियोक्ताने कर्मचार्यांना नोकरीच्या कर्तव्याच्या कामकाजादरम्यान परिधान केलेल्या गणवेश खरेदीची / किंवा देखभाल करण्याची किंमत पूर्ण करण्यासाठी दिलेला भत्ता समाविष्ट केला आहे.
खालील संकेतस्थळावर महिलां कर्मचाऱ्यांसाठीची नवीन रजे बाबत जाणून घेऊ शकता 'मासिक पाळी रजा': गरज कायदा आणि प्रबोधनाची ... ' तरुण भारत" https://tarunbharat.com/dailynews/837902
- "पीसीएमसीने 469 कंत्राटी कामगारांच्या खात्यात 38 कोटी रुपये जमा केले आहेत" हे वाक्य गूगल सर्च वर टाका व www.esakal.com , www .dailykesari.com ,mpcnews.in या सारख्या इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रात हि बातमी मराठीत वाचा . सदर बातमी कंत्राटी कामगारांच्या "सामान काम सामान वेतन " हक्काची बातमी आहे .
१/०१/२०२१ ते ३०/०६/२०२१ चा विशेष भत्ता येणार आहे का? ग्रामपंचायत कर्मचारी यांना वाढीव वेतन वाढ कधी लागू होणार
उत्तर द्याहटवाकृपया "किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१" ही पोस्ट बघावे.
हटवाDA हा किमान सहा माहीनांनी किती रुपये वाढतो ते calculetion plz सांगा
उत्तर द्याहटवा