किमान वेतन कसे काढावे? १.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता

 १.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता 


किमान वेतन अधिनियम१९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी (कामगार उपयुक्त , कामगार विभाग , महाराष्ट्र शासन ) यांचे द्वारा दर सहा महिन्यांनी विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र  काढण्यात येते . १.१.२०२० ते ३०.६.२०२० या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर खालील सूचनापत्रात दिले आहे . 

एखाद्या अनुसूचित उद्योगा करीता  विशेष भत्ता हा तिन्ही परिमंडळासाठी एकच राहतो जेंव्हा कि त्या उद्योगासाठीचे मूळ वेतन हे प्रत्येक परिमंडळासाठी वेगवेगळे असतात.  विशेष भात्याची दर रक्कम खालील सूचनापत्रात प्रति महिना दिली आहे . 

किमान वेतन =मूळ वेतन +विशेष भत्ता 


किमान वेतन हे मूळ वेतन व विशेष भत्ता जोडून काढलेली रक्कम आहे . महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो . 


किमान वेतन प्रति महिना काढल्या जातो . यास आपल्याला प्रति दिवस काढायचे असल्यास एकूण किमान वेतनास २६( कामाचे दिवस ) ने भागावे . उदाहरणार्थ, परिमंडळ ३ ग्रामीण भागातील अकुशल बांधकाम कामगाराचे किमान वेतन  जानेवारी २०२० मध्ये नवीन विशेष भत्ता (२०२०) अनुसार १३८५१ रुपये आहे . तर त्याचे प्रति दिवस पगार १३८५१ ÷ २६ = ५३२. ७३ एवढे राहील . 

प्रति दिवस पगार  ५३२७३ यास  ८ (प्रति दिवस ८ तास काम )  ने भागल्यास प्रति तास पगार काढता येतो . या उदा. ५३२. ७३ ÷ ८= ६६. ५९/- एवढे डर ताशी पगार राहील. 


विशेष भत्ता(Special Allowance) यास डेअरनेस  ऑलॉव्हन्स  (Dearness Allowance-DA  ) किंवा महागाई भत्ता देखील म्हणतात



**परिमंडळ १, २ , ३ याची माहिती खालील  दस्तावेज क्र . २ महाराष्ट्र शाषण राजपत्र यात दिलेली आहे . तसेच  कुशल , अर्धकुशल व अकुशल कामगार म्हणजे काय ? याबाबत देखील महाराष्ट्र शाषण राजपत्र यात नमूद केले आहे . 




१.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्त्याची  रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र .



विशेष भत्ता  १.७.२०१९ ते ३१.१२.२०१९ व  किमान वेतन कसे काढावे?


 किमान वेतन कसे काढावे/ किमान वेतन गणना कशी करावी ?

किमान वेतन =मूळ वेतन +विशेष भत्ता 


किमान वेतन खालील दोन दस्तावेजांच्या आधारे काढले जातात . ज्या उद्योगातील कामगारांना किमान वेतन लागू होतात त्या उद्योगांचे नाव देखील खालील दस्तावेज क्रमांक १ मध्ये नमूद दिसेल .

दस्तावेज क्र . १

 विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र .
किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी यांचे द्वारा दर सहा महिन्यांनी विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र  काढण्यात येते  

१.७.२०१९ ते ३१.१२.२०१९ या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर :
१.७.२०१९ ते ३१.१२.२०१९ या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर 

१.७.२०१९ ते ३१.१२.२०१९ या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर 
दस्तावेज क्र . २

महाराष्ट्र शाषण राजपत्र

महाराष्ट्र शाषण राजपत्रात वरील रकाना क्रमांक २ मधील प्रत्येक उद्योगांसाठी मूळ वेतन बाबत साधारणतः दर पाच वर्षांनी अधिसूचना प्रकाशित केली जाते. 











  वरील दस्तावेजांच्या साह्यतेने किमान वेतन खालीलप्रमाणे काढावे . 

१. आपल्या उदाहरणातली कामगार ही औषधी द्रव्ये व औषध बनविणाऱ्या       कारखान्यातील (जो की परिमंडळ २ मध्ये स्थित आहे) अकुशल कामगार आहे. 

२. महाराष्ट्र शाषण राजपत्रातील अनुसुचित  औषधी द्रव्ये व औषध बनविणाऱ्या परिमंडळ २ मध्ये स्थित  उद्योगातील  अकुशल कामगार कामगारांना देय असलेले  मूळ किमान वेतन दर (दरमहा रुपये ) ६२०० दर्शिवली आहे . 

३. १.७.२०१९ ते ३१.१२.२०१९ या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर  जाहीर करणारे सूचना पत्रात औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योगात  (अ.क्र.१५ येथे) विशेष भात्याची दर  ४१४४ रुपये दर्शविले आहे.   

 ४.     किमान वेतन =मूळ वेतन +विशेष भत्ता 
                             =६२००+४१४४
                             =१०३४४

       आपल्या उदाहरणातली कामगार यांचे  किमान वेतन रुपये १०३४४ एवढे आहे . 
-------------------------------------------------------------------------------
  • "पीसीएमसीने 469 कंत्राटी कामगारांच्या खात्यात 38 कोटी रुपये जमा केले आहेत" हे वाक्य  गूगल  सर्च वर  टाका व  www.esakal.com , www .dailykesari.com , mpcnews.in या सारख्या  इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रात हि बातमी मराठीत वाचा .  सदर बातमी कंत्राटी कामगारांच्या "सामान काम सामान वेतन " हक्काची बातमी आहे . 


   





टिप्पण्या

  1. श्री मिलिंद मधुकर ताजने मु बेलखेडा पो आसेगाव ता रिसोड जिल्हा वाशिम मि 2014 पासुन जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे जिल्हा सेतु समिती मार्फत कंत्राटी वाहनं चालक म्हणून कार्यरत आहे तरिही माझ्याकडे लायसन्स हेवि अनुभव असुनही सुदा मला नकळवता अथापना मधुन मला परिचय करण्यात आले आहे मि जिल्हा अधिकारी साहेबांना अर्ज कला सर जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे वाहनं चालक पद खाली आहेत आणि मि पांच वर्षा पासुन वाहनं चालक होतों आणि मला न सांगता याणि परिचर म्हनुण पोस्टिंग केली तरिही जिल्हा अधिकारी साहेबानि त्यांच्यावर काही निर्णय घेतला नाहीं आणि मला पगार फक्त सात हजार देतात आणि काम आठ तास करुन घेतात पगार वाढसाठी ही अर्ज केला त्यांच्यावरही काहिच कारवाही झाली नाही तरिहि मि आपला आभारी आहे मला मदत करण्यांत यांनी आपला विश्वासू. कंत्राटी कामगार धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्री. मिलिंदजी आपले प्रश्न वाचले , प्रथमदर्शनी आपणास किमान वेतन देत नसल्याचे दिसून येते . आपण किमान वेतन मिळत नसल्याची तक्रार अकोला सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करा व २०१४ पासूनचा किमान वेतनाचा दावा आपल्याला टाकायचे आहे त्याकरिता कार्यालयाने उचित मार्गदर्शन करावे असे अर्जात नमूद करा . कामगार कार्यालय आपणास याबाबत मार्गदर्शन करतील . आपले प्रश्नातील किमान वेतन व इतर मुद्दे ह्याचे सखोल उत्तर मी पोस्टात सविस्तर लिहिलं त्याकरिता मला थोडा वेळ लागेल . किमान वेतन न देणे हे कायद्याने गुन्हा आहे त्याकरिता दंड हि आहे

      हटवा
    2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

      हटवा
    3. श्री. मिलिंदजी तुम्ही 2014 पासुन जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे जिल्हा सेतु समिती मार्फत कंत्राटी वाहनं चालक म्हणून कार्यरत आहात.या https://mahasarkar.co.in/akolabharti/ संकेतस्थळावर जिल्हा सेतु समिती, अकोला , रिक्त पदांची जाहिरात करते. अश्या जाहिरातीद्वारे तुमची नेमणूक वाहन चालक व नंतर परिचारक या पदावर झाली आहे काय ? तुमचे कंत्राटदार कोण आहेत?.

      जे तुमचे कंत्राटदार आहेत तेच तुमचे नियोक्ता/मालक आहेत.
      जेंव्हा कंत्राटदार /नियोक्ता हा कंत्राटी कर्मचारी यास वेतन कमी देतो किंवा देत नाही अशा परिस्थितीत कंत्राटी कामगार याने कंत्राटदारास किमान वेतन देण्याची लिखित विनंती करावी व ती अमान्य झाल्यास जिल्ह्यातील कामगार कार्यालयास त्याची तक्रार करावी. जर कंत्राटदार हा कोणत्याही कारणामुळे वेतन देण्यास टाळाटाळ करतो तेंव्हा प्रमुख नियोक्ता (तुमच्या प्रकरणात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमुख) कंत्राटी कामगारांना वेतन देण्यास कायद्याने बाध्य असतो. प्रमुख नियोक्ता कामगारांना दिलेले पैसे हे कंत्राटदाराच्या बिलातून कपात करून घेऊ शकतो अशी कायद्यात तरतूद आहे.
      वाहन चालक हा किमान वेतन अधिनियम अंतर्गत परिशिष्ठातील सार्वजनिक मोटार वाहतूक उद्योगात , कुशल (ब ) कामगार म्हणून मोडतो परिमंडळ १ महानगरपालिका क्षेत्रात किमान वेतन ५५०० मूळ वेतन + ५४८७ विशेष भत्ता = १०,९८७ रुपये प्रति महिना आहे .
      परिचारक दुकाने व आस्थापना या अनुसूचित उद्योगातील परिमंडळ १ महानगरपालिका क्षेत्रात अकुशल कामगार म्हणून मोडतो त्याचे किमान वेतन १०,०२१ मूळ वेतन + ७५४ विशेष भत्ता = १०,७७५ रुपये प्रति महिना आहे .
      तुमच्या कंत्राटदाराने कुशल कर्मचाऱ्यास सहा वर्षानंतर त्यास ना कळवता अकुशल काम कसे दिले, ही कर्मचाऱ्याच्या हक्कांच्या विरुद्ध कार्यवाही आहे , अन्यायकारक आहे .
      वरील दोन्ही पदांवर किमान वेतना पेक्षा कमी वेतन असल्यास आपल्याला दोन्ही पदांवर फरकाची रक्कम व त्याच्या १-१० पट दंड जर किमान वेतन अंतर्गत प्राधिकृत अधिकारी यांनी आकारल्यास ती सुद्धा एकत्रित रक्कम आपणास मिळू शकेल, त्या करीता आपणास किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळविण्या करिता दोन्ही पदांकरिता वेगवेगळे दावे दाखल करावे लागेल.
      तुम्ही कामगार कार्यालयात तक्रार करा व कायद्याची अंमलबजावणी करण्यास विनंती करा.

      हटवा
  2. माझा iti झाला आहे ,व मी एका खाजगी ग्लास फायबर कंपनीत कामाला आहे, मला 8 तास प्रति दिवस 320 रुपये मिळतात. हे योग्य आहे का?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नाही. किमान वेतना पेक्षा कमी आहे.
      आपण किमान वेतन कायद्यातील परिशिष्टातील काच उद्योगातील कामगार आहात. आपण कोणत्या परिमंडळात (महानगरपालिका/ नगरपालिका /ग्रामीण) काम करतात व आपण कुशल /अकुशल /अर्धकुशल कामगारांपैकी कोणते कामगार आहात हे आपल्या प्रश्नावरून स्पष्ट होत नाही. जर तुम्ही अकुशल कामगार आहात व परिमंडळ 3 क्षेत्रात काम करीत आहात तर आपणास किमान वेतन 10,536 रूपय महिना व 405 रूपय प्रती दिवस (8 तास कामाचे वेतन आहे).किमान वेतनाचा तक्ता कामाच्या ठीकाणी मालकाने लावणे कांद्याने बंधनकारक आहे. आपण किमान वेतनाची मालकास मागणी करू शकता. ती अमान्य झाल्यावर कामगार कार्यालयात तक्रार दाखल करू शकता. आतापर्यंत कमी मिळालेल्या किमान वेतनाची भरपाई पण मिळवू शकता.

      हटवा
  3. कामगार किमान वेतन कायदा कधी लागू झाला त्याची महीती द्यावी, व त्याची आदेशाची प्रत पाठववी 🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. किमान वेतन अधिनियम, १९४८ हा कायदा १५ मार्च १९४८ रोजी लागू झाला .आपण 'महाकामगार' https://mahakamgar.maharashtra.gov.in/acts-rules-mr.htm या महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या कायद्याची प्रत डाउनलोड करू शकता .

      हटवा
  4. औरंगाबाद अग्निशमन मनपा विभागात गेल्या 4 वर्षा पासुन 60 फायरमन 10 वाहन चालक कार्यरत आहे 26 दिवसाचे 10795 फक्त वेतन मिळते आम्ही कुशल / टेकनिकल या वर्गात मोडल्या जातो तर किमान वेतन नुसार आम्हला वेतन किती असेल
    मला आपण व्हाट्सउप केलं खूप मदद होईल 9763200505

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अक्षयजी आपण व आपले सहकर्मी महानगरपालिकाचे कर्मचारी आहेत कि कंत्राटी कर्मचारी आहेत हे स्पष्ट होत नाही. जर आपण व आपले सहकर्मी महानगरपालिकाचे कर्मचारी आहेत तर आपण सर्वांना किमान वेतन अधिसूचनेतील " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) या उद्योगातील परिमंडळ १ चे कुशल कामगारांचे वेतन लागू होईल . त्या करीता खालील पोस्ट वाचा -
      किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.१.२०२० ते ३०.६.२०२० व नवीन सुधारीत विशेष भत्ता ५२५०/- MINIMUM WAGES Local Authority(other than Village Panchayat) 2020 या पोस्ट मध्ये महानगरपालिकाचे कर्मचारी यांचे किमान वेतन दिले आहे.
      " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) चे परिमंडळे दिनांक १८ मे २०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र अंतर्गत शुध्दीपत्रात खालील प्रमाणे आहेत .
      परिमंडळ १-- महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका आणि " अ " वर्ग ," ब " वर्ग नगरपालिका हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्था;
      परिमंडळ २-- महाराष्ट्र राज्यातील " क " व ," ड " वर्ग नगरपालिका/नगरपरिषदांच्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्था;
      परिमंडळ ३-- परिमंडळ १ व , परिमंडळ २ वगळून राज्याच्या उर्वरित सर्व स्थानिक स्वराज्य संस्था;

      आपण व आपले सहकर्मी परिमंडळ १ मध्ये मोडता व महानगरपालिकातील कुशल कामगारास १९,२५० रुपये एवढे प्रति महिना वेतन आहे .
      या https://www.pcmcindia.gov.in/marathi/circular-details.php?id=54 संकेतस्थळावर भेट द्या व महानारपालिका किमान वेतन परिपत्रक कसे जाहीर करते ते बघा .आपल्या महानगरपालिकेस किमान वेतन जाहीर करण्याची विनंती करा . किमान वेतन जाहीर करणे , कामगारांसाठी किमान वेतन माहिती सूचना फलकावर लावणे हे नियोक्त्यावर बंधनकारक आहे .

      हटवा
  5. महाराष्ट्रात किती ग्रामपंचायती 25 हजार लोकसंख्येच्या वर आहेत

    उत्तर द्याहटवा
  6. ग्रामपंचायत कर्मचारी आकृतीबंधानुसार जे किमान वेतन व राहणीमान भत्ता मिळतो त्यात जर ग्रामपंचायत किमान वेतनाइतकाच १००% महागाई भत्ता कर्मचार्यांना ठरावानुसार देत असेल तर ग्रामसेवक तो देण्यास अडचण निर्माण करतात व ३५% कर्मचारी वेतन व वसुलीची अट सांगतात व देण्यास नकार देतात पण सदरची १००% वाढीव रकमेतून राहणीमान भत्ता वजा करून उरलेली वाढीव रक्कम पगारपत्रकावर अधिदानासाठी राखून ठेवून ती रक्कम दिली जात नाही असे करणे योग्य आहे ? यात फायदा कुणाचा याबाबद मार्गदर्शन अपेक्षित
    नंदकिशोर वाळके पत्रकार लोकमत

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नंदकिशोरजी  किमान वेतन अधिनियम 1948 कायदा यात  वेतन, किमान वेतन दरापेक्षा कमी नसावेत अशी तरतूद आहे. वेतन, हे किमान वेतन दरापेक्षा कितीही जास्त असू शकेल परंतु वेतन, किमान वेतन दरापेक्षा कमी नसावे. ग्रामसेवक हे शासनाकडून नियुक्त असून ग्रामपंचायतीचे कारभार नियमानुसार चालावे ही जबाबदारी  ग्रामसेवकावर आहे. जर ग्रामसेवक ठरावाशी सहमत नाहीत तर ते असे कोणत्या नियम/कायद्यानुसार करीत आहेत असे  ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी विचारू शकतात. जर आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे या आधी वेतन मिळत होते तर ते कमी करणे(काही गंभीर कारणाशिवाय) हे कायदेशीर मानले जात नाही.

      हटवा
  7. सर आम्ही 2011 पासून महाराष्ट्र परिवहन विभाग आरटीओ विभाग येथे कंत्राटी वाहन चालक म्हणून कार्यरत आहोत तरी आम्हाला सुधारित किमान वेतन महागाई भत्ता व इतर असणारी भत्ते एकूण पेमेंट याची सविस्तर माहिती द्यावी कृपया

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुम्ही आरटीओ, मोटार वाहन विभाग , महाराष्ट्र या शासकीय आस्थापनेत कंत्राटी वाहन चालक आहात. तुमचे कंत्राटदार यांची आस्थापना दुकाने व आस्थापना या किमान वेतन अनुसूचित उद्योगात नोंदीत असेल . तुम्हाला दुकाने व आस्थापना या किमान वेतन अनुसूचितील उद्योगातचे कुशल कामगारांचे वेतन लागू होईल . तुम्ही किमान वेतन २०२० दुकाने व आस्थापना या पोस्टात किमान वेतन बाबत सविस्तर पाहू शकता.

      हटवा
  8. कीमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात

    उत्तर द्याहटवा
  9. सर मी ग्रामपंचायत मध्ये संगणक या पदावर काम करतो माझी नियुक्ती १/०१ /२०१३ ला झाली आहे ..मला वेतन श्रेणी लागू करायची आहे मला कोणती वेतन श्रेणी लागू करता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती ..समीर नेहारे ग्रामपंचायत इसासनी ता-हिंगणा,जी-नागपूर .८४२१५४९६४४

    उत्तर द्याहटवा
  10. घरभाडे भत्ता हा फक्त इंडस्ट्री मधील कामगार यांना लागू आहे का? मुंबई महानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगाराना घरभाडे भत्ता लागू होतो का?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मुंबई महानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगाराना घरभाडे भत्ता लागू होईल जर कामगारांची संख्या 50 च्या वर असेल.
      https://www.pcmcindia.gov.in/marathi/circular-details.php?id=54 या संकेत स्थळावर 1.1.2021 ते 30.6.2021 या कालावधीत पिंपरी
      चिंचवड महानगरपालिकेचे कंत्राटी कामगारांचे किमान वेतन प्रसिद्ध करण्यात आले आहेत आपण ते उदाहरण म्हणून बघू शकता.

      हटवा
  11. शिर्डी साईबाबा संस्थान मध्ये कंत्राटी परिचारिका म्हू न साईनाथ हॉस्पिटल मध्ये 10 yrs काम करत आहे तर आम्हाला किती वेतन दिले पाहिजे या संदर्भात माहिती मिळेल का.साध्य सांस्थन आम्हला 17500 31 duty वेतन देतात आणि pf कट होवून 16550 एवढे कट होवून वेतन मिळते आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी माझे General nursing midwife च 3 yrs diploma course झाले आहे.hopsital मध्य स्टाफ nurse म्हणून काम करतो आहे .कंत्राटी पद्धतीने.

      हटवा
    2. प्रथमदर्शणी आपणास किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असल्याचे आढळत आहे जे की आपले अनुभवास अनुसरून योग्य असल्याचे वाटते. परंतु खालील प्रश्नांची ऊत्तरे कळल्यास निश्चितपणे सांगता येईल.
      1 ड्युटी किती तासाची आहे? सलग 6 दिवस काम केल्यावर 7व्या दिवशी सुट्टी असते का? महीन्यात किती दिवस काम करता? आठवड्यात किती तास काम करता? दररोज किती तास काम करता?

      हटवा
    3. 2 morning 6 hrs,2 evening 6 hrs,2 night 12 hrs आहे.after night 1 holiday असतो.

      हटवा
    4. आपली आस्थापना किमान वेतन कायद्याअंतर्गत अनुसूचि मध्ये रुग्णालय उद्योगात मोडते . आपली आस्थापना शिर्डी येथे आहे ,तेंव्हा आपले किमान वेतन रुग्णालय उद्योग परिमंडळ ३ मधील मूळ वेतन ५८०० रु व विशेष भत्ता ५७१० रु ( १.१. २०२१ ते ३०. ६. २०२१ पर्यंत ) यांची एकूण बेरीज
      ११,५१० रु एवढे आहे . परंतु सदर वेतन हे संपूर्ण महिना ज्यात २६ दिवस काम (दर कामाच्या दिवशी आठ तासांपेक्षा जास्त काम नाही) व ४ दिवस सुट्टी अंतर्भूत आहे , तसेच एका आठवड्यात ४८ तासापेक्षा जास्त काम नाहीं या कायद्याचे तरतुदींसोबत लागू होते . जरी आपणास किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असल्याचे आढळत आहे वरील तरतुदीच्या अंतर्गत आपल्या ३१ ड्यूटी २६ दिवसात कसे बसतात , कामाचे तास कायद्याचे तरतुदीच्या अंतर्गत बसतात का, आठ तासांवर काम केल्यावर अतिरिक्त कामाचा भत्ता दिला जातो का हे बघा .आपण जिल्ह्यातील कामगार विभाग कार्यालयास भेट देऊन शंकेचे निरासण करू शकता .आपल्या कामाचा कालावधी दहा वर्षांपेक्षा जास्त आहे आपणास वार्षिक वेतनवाढ दिली गेली पाहिजे .दहा वर्षापासून सेवा देत असल्याने किमान वेतनापेक्षा जास्त वेतन मिळणे कायदेसंगत व एका कर्मचाऱ्याचे हक्क आहे .
      आपण कंत्राटी कर्मचारी असला तरी आपणास किमान वेतन कायदा व कंत्राटी कामगार कायदा व इतर कामगार कायद्यातील तरतुदी लागू होतात.

      हटवा
    5. कंत्राटी कामगाराला सार्वजनिक सुट्ट्या सणाच्या सुट्ट्या का मिळत नाही महाराष्ट्र दुकाने आस्थापना अधिनियम अंतर्गत सुट्ट्या लागू आहे त्याचा लाभ कंत्राटी कामगारांना का मिळत नाही

      हटवा
  12. Namskar sir.....mi solapur mahanagar paliket 5 varshapasun mandhan var JCB operates mhanun kam kart aahe tar mala ithe faqt 9500 vetan aahe ....
    Tar mala kiti vetan asayla pahije

    उत्तर द्याहटवा
  13. आत्ता सध्या किमान वेतन किती आहे हे मला समजेल का
    कारण मी सध्या जिथे काम करतो तिथे किमान वेतन फक्त १०००० PF कट करून दिला जातो
    तर या बाबतीत मला माहीती मिळावी ही नम्र विनंती

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कृपया आपण कोणत्या उद्योगात काम करता हे कळल्यास आपण काम करीत असलेल्या उद्योगाचे किमान वेतन सांगता येईल .

      हटवा
    2. अग्निशमन कंञाटी कामगार
      नगरपरिषद ब वर्ग
      फायरमन‌ पद

      हटवा
  14. मी 3 एप्रिल 2020 पासून पोलिस मुख्यालय जालना येथे अंशकालीन कर्मचारी म्हणून काम करत आहे मला किमान वेतन लागू होईल का

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ग्रामपंचायत वगळून स्थानिक स्वराज्य संस्था यांचा नवीन किमान वेतन परिपत्रक मिळेल का

      हटवा
  15. मी आनंद खामकर गेली 16 वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे 2004 पासून एका नामांकित बँकेमध्ये ठेकेदारामार्फत काम करत आहेबँकेमध्ये सदर काम आहे कायमचा कायमस्वरूपी असून तेथे हंगामी कामगार का वापरला जातो याबाबतीत केंद्र सरकार राज्य सरकार का लक्ष घालून कामगारांची पिळवणूक थांबू शकत नाही कंत्राटी कामगारांनी जर संघटना केली तर त्याला त्वरित कामावरून काढून टाकण्यात येते त्याच्या हक्कासाठी त्याने कोणाकडे भांडावे प्रथमदर्शी काम करा शिक्षित नसतो व ठेकेदार त्याची पिळवणूक करतो माझी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू यांना या बाबतीत लक्ष घालून योग्य तो निर्णय घेऊन कामगारांना योग्य तो न्याय द्यावा तुझं व महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांची होणारी पिळवणूक आपण थांबवावी ही नम्र विनंती

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी गेले 20वर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे फार पिळवणूक होते याला कारण सब मिली भगत आहे

      हटवा
  16. सर मी औरंगाबाद वाळुंज एम आय डी सी येथे कंपनी त सिओटू वेल्डर म्हणून काम करत आहे या कंपनीत टोटल 13कामगार काम करत आहे तरी मी ITI वेल्डर आहे मला या कंपनीत 7वर्ष झाले मला 8तासाला 10 हजार पगार मिळतो रोज 12तासकाम करावे लागते तरी मला किमान वेतन किती बोनस किती पगारी रजा किती मिळाले पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  17. सर मला एका खाजगी कंपनी त 7वर्ष झाले मी काम करत आहे तरी मला पगार 8तासाला 10हजार आहे मी सिओटू वेल्डर आहे कंपनी 13कामगार आहे तरी आम्हाला पगार किती मिळायला पाहिजे आणखी काही फॅसिलीटी मिळायला पाहिजे का



    उत्तर द्याहटवा
  18. सर मी एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे..माझे असे प्रश्न आहे की दर सहा महिन्याला जे राहणीमान भत्ता वाढ होते ती वाढ कशा पद्धतीने काढली जाते...जसे की ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधी साठी नवीन भत्ता 217 झाला आणि नंतर 1जानेवारी 2021 ते 30 जून 2021 या कालावधी साठी 403 झाला...पुढील सहा महिन्याचे नवीन दर कसे काढायचे..समजवावे ही विनंती..

    उत्तर द्याहटवा
  19. सर मी ITI मधे तासिका तत्वावर तासिका निदेशक म्हणून काम करतो, तर मला प्रति महिना किती मानधन मिळायला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवीन १.१.२०२१ ते ३०.६.२०२१ सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र /DA/SPECIAL ALLOWANCE 1 JAN. 2021 - 30 JULY 2021

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून) १.७.२०२२ ते ३१.१२.२०२२ ,MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other than VILLAGE PANCHAYAT)

KAMGAR MITRA किमान वेतन २०२० इमेजेस /MINIMUM WAGES 2020 IMAGES

किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१

किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES

Minimum Wages 1 January 2020 to 30 June 2020 REVISED SPECIAL ALLOWANCE and What to do when wages are not Paid for work done? Effect lockdown

किमान वेतन कारखाने २०२२ Maharashtra Minimum Wages 2022FACTORIES RESIDUAL (FACTORIES NOT COVERED UNDER SCHEDULE)

NEW DA/SPECIAL ALLOWANCE 1 JULY 2020 - 31 DEC. 2020

जब किए गए काम के लिए भी वेतन भुगतान नहीं किया जाता है तो क्या करें? लॉकडाउन का प्रभाव