अंशकालीन सफाई कामगारांचे सर्व हक्क - वेतन, EPF/ESIC आणि तक्रार प्रक्रिया


 अंशकालीन सफाई कामगारांचे सर्व हक्क - वेतन, 

EPF/ESIC आणि 

तक्रार प्रक्रिया


प्रश्न:
“मी अंशकालीन सफाई कामगार आहे. माझे पगार, हक्क आणि सुरक्षा काय आहेत?”

उत्तर: कामगारमित्राचे मार्गदर्शन:- हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक अंशकालीन सफाई कामगार रोज मेहनत घेतात, पण त्यांना त्यांच्या हक्कांची पुरेशी माहिती नसते. खाली साध्या भाषेत सगळे मुद्दे दिले आहेत


      १. अंशकालीन सफाई कामगार म्हणजे कोण?

  • जे कामगार रोज ठराविक काही तास (उदा. २–४ तास) काम करतात, त्यांना अंशकालीन सफाई कामगार म्हणतात.

  • ते ग्रामपंचायत, नगरपालिका, शाळा, सरकारी कार्यालय किंवा ठेकेदारामार्फत काम करतात.


     २. नेमणूक आणि नोकरीतील सुरक्षा

  • कामावर घेताना लेखी नियुक्तीपत्र (Appointment Letter) देणे आवश्यक आहे.

  • कामगाराचे नाव स्थानिक संस्थेकडे नोंदवलेले असावे.

  • वर्षानुवर्षे काम केल्यास स्थायीकरण (Regularisation) साठी अर्ज करता येतो.

  • कोणत्याही कामगाराला अचानक काढून टाकणे योग्य नाही; आधी नोटीस आणि कारण सांगणे आवश्यक आहे.


    ३. पगार आणि मजुरी

     किमान वेतन (Minimum Wage) — महाराष्ट्र ( दिनांक 01.07.2025 ते दिनांक 31.12.2025 २०२५)

       सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन तपशील (महाराष्ट्र किमान वेतन दरानुसार)

 पूर्णकालिक सफाईगार / पर्यायी मेहतर (Full-Time Sweeper / Scavenger Equivalent)

परिमंडळ (Zone)किमान मूळ वेतन (Basic Pay) (रु.)विशेष भत्ता (Special Allowance) (रु.)एकूण मासिक वेतन (Total Monthly Earning) (रु.)
परिमंडळ I10,0006,83416,834
परिमंडळ II9,7506,83416,584
परिमंडळ III9,4506,83416,284

अंशकालिक सफाईगार / पर्यायी मेहतर (Part-Time Sweeper / Scavenger Equivalent)-

दररोज ४ तास काम करणारे (Working 4 hours per day)

परिमंडळ (Zone)

पूर्णकालिक एकूण वेतन (रु.)

अंशकालिक (६०%) मासिक वेतन (रु.)

परिमंडळ I

रु. १६,८३४

रु. १०,१०१

परिमंडळ II

रु. १६,५८४

रु. ९,९५०

परिमंडळ III

रु. १६,२८४

रु. ९,७७०


टीप:अंशकालिक वेतन (दररोज ४ तास काम) हे पूर्णकालिक वेतनाच्या (Total Earning) ६०% असते. उदाहरणार्थ, परिमंडळ I साठी: रु. १६,८३४ x ६०% = रु. १०,१०१.

🪙 महत्वाचे:

  • पगार वेळेवर मिळणे हा हक्क आहे.

  • पगार थकला तर कामगार कार्यालयात (Labour Officer) तक्रार करता येते.

  • पगार रोखून ठेवणे, कपात करणे किंवा उशीर करणे बेकायदेशीर आहे.


    ४. आरोग्य आणि सुरक्षा

  • काम करताना हातमोजे, मास्क, बूट, गणवेश देणे हे नियोक्त्याचे कर्तव्य आहे.

  • सफाई कामगारांना आरोग्य तपासणी आणि लसीकरण नियमितपणे मिळायला हवे.

  • हाताने मैला साफसफाई करायला लावणे कायद्यानुसार गुन्हा आहे.

  • कामाच्या ठिकाणी आदराने वागणूक मिळणे हा हक्क आहे.


     ५. लागू कायदे

  • किमान वेतन अधिनियम, १९४८

  • वेतन वेतन प्रदान अधिनियम, १९३६

  • कंत्राटी कामगार अधिनियम, १९७०

  • समान वेतन अधिनियम, १९७६

  • हाताने मैला साफसफाई प्रतिबंध आणि पुनर्वसन अधिनियम, २०१३                                                THE PROHIBITION OF EMPLOYMENT AS MANUAL SCAVENGERS AND THEIR REHABILITATION ACT, 2013

  • कामगार कल्याण मंडळ अधिनियम (राज्यानुसार लागू)


    ६. सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजना

         EPF आणि ESIC (कर्मचारी विमा योजना)

           तुम्ही अंशकालीन कामगार असलात तरी, तुम्हाला सामाजिक सुरक्षा मिळणे हा तुमचा हक्क आहे.

  • EPF (प्रोविडंट फंड) – Part-time सफाई कामगारांना लागू .

    • कायद्यात कायम, तात्पुरता, दैनंदिन, अंशकालीन, कंत्राटी असा कुठलाही फरक नाही.

    • एकदा संस्था/कंपनीमध्ये 20 किंवा जास्त कामगार झाले की सर्व कामगारांना EPF लागू.

    • कामगार दिवसात 2 तास काम करत असला तरी EPF लागू.

    • अंशकालीन असल्यामुळे पगार कमी असेल, त्यामुळे Basic + DA साधारणपणे ₹15,000 पेक्षा कमी असतो — म्हणून EPF सक्तीचा.

  • ESIC – Part-time सफाई कामगारांना लागू .

    • ESIC मध्ये "employee" ची व्याख्या खूप व्यापक आहे.

    • कायम, तात्पुरते, casual, daily wage, part-time, contract—सर्वांचा समावेश होतो.

    • कंपनी/संस्था ESIC मध्ये आली (10+ कर्मचारी) आणि कामगाराचा ग्रॉस पगार ₹21,000 पेक्षा कमी असेल तर:
      ✔ ESIC अत्यावश्यक
      ✔ Part-time → पूर्णपणे कव्हर

    • आरोग्य सुविधांसाठी ESIC (Employees’ State Insurance) लागू होतो, ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मोफत/सवलतीत वैद्यकीय उपचार मिळू शकतात.                                          



७. न्याय मिळवण्यासाठीची सर्वोच्च संस्था: महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग       जर तुमचे हक्क स्थानिक पातळीवर डावलले जात असतील, तर तुम्ही थेट 'महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग' या शासकीय आयोगाकडे संपर्क साधू शकता. हा आयोग तुमच्या वारसा हक्काची नोकरी (Hereditary Appointment), पदोन्नती (Promotion) आणि नुकसान भरपाईसाठी (Compensation) सक्रियपणे काम करतो.

    • महत्त्वाचा सल्ला: स्थानिक पातळीवर किंवा कामगार कार्यालयात तुमच्या तक्रारीवर कार्यवाही होत नसेल, तर थेट आयोगाकडे (Commission) संपर्क साधा.

 

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग (Maharashtra State Commission for Safai Karamcharis)

स्थापना

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अधिनियम, १९९७ नुसार स्थापन झालेली शासकीय संस्था.

मुख्य उद्देश

राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांचे संनियंत्रण (Monitoring) करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे.

आयोगाद्वारे मिळणारे मुख्य लाभ

वारसा हक्काची नोकरी: निवृत्त/अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळवून देणे. (लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार).

पदोन्नती (Promotion): शिक्षित सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे.

नुकसान भरपाई: हाताने मैला साफ करताना किंवा गटार साफ करताना झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणांमध्ये कुटुंबांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देणे.

तक्रार निवारण: वेतन, PF जमा न करणे, किंवा कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय अशा वैयक्तिक तक्रारींचा त्वरित निपटारा करणे.


मुख्य लाभ: या आयोगाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित केली जाते.

     

     ८.  त्वरित कृती: अन्याय झाल्यास काय करावे? (Action Guide)

       नेहमी लक्षात ठेवा, आदर, सुरक्षितता आणि योग्य मजुरी हे तुमचे मूलभूत अधिकार आहेत.

  • तक्रार कोठे करावी?

    • जवळच्या कामगार अधिकारी (Labour Officer) किंवा महानगरपालिका मुख्य कार्यालयात लेखी तक्रार द्या.

  • पुरावा जोडा:

    • तक्रारीसोबत तुमची पगार पावती (Salary Slip), उपस्थिती नोंद (Attendance Record), ओळखपत्र किंवा नियुक्तीपत्राचे (Appointment Letter) पुरावे जोडा.

  • संघटनांची मदत:

    • स्थानिक सफाई कामगार संघटना / युनियन यांची मदत घ्या.


"स्वच्छाता राखायचे काम समाजासाठी अत्यंत महत्वाचं आहे. स्वच्छता म्हणजे आरोग्य, आणि सफाई कर्मचारी  त्याचे रक्षक आहेत. तुमच्या हक्कांची माहिती ठेवा, अन्याय झाल्यास आवाज उठवा.                     
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी कामगार मित्राला फॉलो करा!" 
___________________________________________________

२१ नोव्हेंबर २०२५ रोजी सरकारने चार नवीन कामगार कायदे लागू केले. वर्तमानपत्रात, टीव्हीवर, सगळीकडे याची चर्चा सुरू आहे.पण प्रत्यक्षात काय बदललं? तुमच्यासाठी काय फायदा आहे? आणि कुठे सावध राहायला हवं?या साठी वाचा कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत Day 0 Labour Codes 2025: Your Daily Decoder. ही ब्लॉग पोस्ट 
वाचण्यासाठी क्लिक करा.
         


टिप्पण्या

Minimum wage, New Labour Code series

तुमचे किमान वेतन (Minimum Wage) कसे काढायचे? | मूळ वेतन + विशेष भत्त्यासह अचूक गणना (सर्व ६७ उद्योगांसाठी)

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून)१.७.२०२४ ते ३१.१२.२०२४ ,MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other than VILLAGE PANCHAYAT)

२०२४ सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र /DA/SPECIAL ALLOWANCE 2024

KAMGAR MITRAकिमान वेतन ग्रामपंचायत २०२४ इमेजेस/MINIMUM WAGES IMAGES

किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१

किमान वेतन २०२५ जून पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२५, विशेष भत्ता २०२५

किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES

How To calculate Minimum Wages in India.

किमान वेतन २०२४ दुकाने व आस्थापना SHOP AND ESTABLISHMENT'S MINIMUM WAGES

किमान वेतन कारखाने २०२४ Maharashtra Minimum Wages 2024FACTORIES RESIDUAL (FACTORIES NOT COVERED UNDER SCHEDULE)