"महाराष्ट्रातील ओव्हरटाइम वेतन कायदे: कामगारांसाठी संपूर्ण मार्गदर्शक"
Over Time Allowance- जादा कामाचा मोबदला / अतिकालिक कामाच्या तासचे किंवा अतिरिक्त तास काम करण्यासाठी जादा कामाचा भत्ता. शंकरची कहाणी: ओव्हरटाइमच्या हक्कांची लढाई शंकर कोण आहे? शंकर हा महाराष्ट्रातील एका लहानशा दुकानात काम करणारा कामगार आहे. त्याच्या दुकानाचा मालक त्याला वारंवार ओव्हरटाइमसाठी बोलावत असतो. शंकर नियमाने 9 तास काम करतो, पण त्याला आठवड्यातील सुट्ट्यांवर आणि कामाच्या वेळेपलीकडे काम करण्यास भाग पाडले जाते. मालक त्याला ओव्हरटाइमचे पैसे द्यायला सांगतो, पण काही महिने झाले तरी त्याला पैसे मिळालेले नाहीत. शंकरला कायद्याविषयी फारशी माहिती नसली तरी, तो कामाचे रेकॉर्ड ठेवतो आणि नंतर योग्य ती कारवाई करायचा विचार करतो . स्टेप 1: शंकरचे हक्क ओळखणे शंकरला एका मित्राकडून कळते की महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अिधिनयम,१९४८ अंतर्गत ओव्हरटाइमचे पैसे दुप्पट मिळायला हवेत. शिवाय, दुकानाचा मालक त्याला 8-9 तासांपेक्षा जास्त काम करायला भाग पाडू शकत नाही. शंकरने ठरवले की तो त्याच्या हक्कांसाठी लढणार. किमान वेतन २०२४ डिसेंबर पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२४, विशेष भत्ता २०२४ ये