करोना- कामगार -कायदा- वस्तुस्थिति:-एक दृष्टीक्षेप

करोना आपत्तीत कारखाने व इतर उद्योग/आस्थापनात कामगारांचे मार्च महिन्याचे वेतन मिळाले काय? 

करोना- कामगार -कायदा- वस्तुस्थिति:-एक दृष्टीक्षेप 



कोविड- 19  विषाणूचा प्रादुर्भाव  - लॉकडाऊन कालावधीत  बेघर/ विस्थापित कामगार
व  परराज्यातील  अडकललेे कामगार  यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात
न करण्याबाबत अथवा त्यानां कामावरून कमी न करणेबाबत.. महाराष्ट्र शासन, उद्योग,
ऊर्जा व कामगार विभागने शासन निर्णय: संकीर्ण 2020/ प्र. क्र. 45/काम-9 दिनांक 31 
मार्च 2020 रोजी निर्गमित केले आहे . 
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 
उपलब्ध  करण्यात  आला असून  त्याचा  सांकेतांक  202003311640518610  असा आहे. 

संपुर्ण जग कोरोना व्हायरस  Covid-19 च्या  प्रादुर्भावामुळे अत्यंत  अडचणींचा सामना करत 
असतांना त्या विरुद्धच्या एकत्रित  प्रयत्नांचा भाग म्हणनू याबाबत  वरील शासन निर्णयसंकीर्ण 
2020 / प्र. क्र. 45 / काम-९  दिनांक 31 मार्च  2020  व  त्यात  नमूद  केंद्र  शासन व राज्य 
शासनाचे  पत्र, शासन  निर्णय, व  आदेशान्वये पत्र - सचिव श्रम व रोजगार मंत्रालय, भारत 
सरकार यांचे क्रमांक:एम-११०११/०८/२०२०मिडिया,दिनांक २० मार्च,२०२० चे पत्रआदेश- ग्रह 
मंत्रालयभारत सरकार यांचे  क्रमांक : ४०-३/२०२०/ डीएम- आय(ए) दिनांक २९  मार्च२०२०  
चे आदेश व  शासन निर्णय शासन निर्णयमहसूल व  वन  विभाग, क्रमांक: डीएमयु /२०२०/ 
प्र.क्र.९२/ डीआयएसएम-१दिनांक २० मार्च२०२०, महाराष्ट्र  शासन, उद्योग, उद्योग, ऊर्जा 
व कामगार विभाग शासन निर्णय:संकीर्ण 2020/ प्र.क्र.45/काम-9  नांक 31 मार्च 2020).
कशाप्रकारे खबरदारी घ्यावी  व समाजातील कामगार वर्गांवर  याचा दुष्परिणाम  होणार
नाही याबाबत काय उपाययोजना करावी याअनुषांगाने सविस्तर सूचना देण्यातआलेल्या आहेत.

त्यात  कोरोना  विषाणूचा  प्रादुर्भाव  रोखण्यासाठी  करण्यात  आलेल्या लॉकडाऊन संदर्भातील 
महाराष्ट्र  शासनाच्या आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग-व्यवसायातील तसेच  अन्य दुकाने व इतर 
आस्थापनातील  प्रभावित  झालेले परराज्यातील विस्थापीत कामगार यांच्या संदर्भात सर्व खाजगी
आस्थापना, कारखाने,कंपन्या , दुकाने  इत्यादी आस्थापनांचे कामगार (कंत्राटी, बाहयस्त्रोताद्वारे 
उपलब्ध  करुन  घेण्यात आलेले  कर्मचारी व  कामगार, तात्पुरत्या कालावधीसाठीचे कर्मचारी व 
कामगार, रोंजदारीवरील कामगार ) ज्यानां  या  कोरोना वायरस  Covid-19  च्या  प्रादुर्भावामुळे 
महाराष्ट्र शासनाच्या आदेशामुळे घरी / स्थानबध्द राहावे लागत आहे, अशा सर्व कामगार/ 
कर्मचारी  हे कर्तव्यावर असल्याचे समजण्यात यावे  त्यांना  संपुर्ण  वेतन  व भत्ते अदा करण्यात
यावेत. हे आदेश महाराष्ट्रातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, व वाणिज्यिक, व्यापारी व दुकाने 
आस्थापनांना  लागू राहतील. या  आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे स्पष्टपणे नमूद 
केले आहे . 


आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम ५१(बी) चे अनुसार केंद्र सरकार /राज्य सरकार
/राष्ट्रीय कार्यकारी समिती/ राज्य कार्यकारी समिती/जिल्हा प्राधिकरण यांनी सदर कायद्या अंतर्गत
निर्गमित केलेले कोणतेही निर्देशाचे आदेशाचे पालन  करण्यास  नकारदिल्यास  सदर  कायद्या
अंतर्गत खालील दंड आहे. 

51. Punishment  for  obstruction, etc.- Whoever, without reasonable  cause-
a.
b. refuses  to  comply  with  any  direction  given by  or on behalf of the Central
Government  or  the  State  Government  or the  National Executive Committee
or the State Executive Committee or the District  Authority under this  Act, shall
on conviction be punishable with imprisonment for a term which may extend  to
one year or with fine, or with both, and if such  obstruction or refusal  to comply
with  directions  results  in  loss  of  lives  or imminent danger  thereof, shall  on 
conviction  be  punishable  with  imprisonment  for a term which may extend  to
two years.

असे असतांना देखील कामगारांचे वेतन अद्याप काही आस्थापनांनी दिलेलेच नाहीत तर या  उलट
माननीय  सर्वोच्च  न्यायालयात  या संदर्भात विविध आस्थापना  व विविध कामगार संघटनांनी वाद
दाखल केले आहे . वृत्तपत्र बातमीसाठी खालील लिंक दिल्या आहेत . 


"Set aside MHA, Maharashtra govt orders
compelling payment of  full wages  during
Covid lockdown: Textile  company  moves 
SC"  
बार अँड बेंच

वरील बातमीत केंद्रीय गृहमंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने कोव्हीड -१९ लॉकडाऊन दरम्यान 
निर्गमित   केलेल्या   कामगारांना   लॉकडाऊन  दरम्यान  पूर्ण  वेतन  देण्याच्या आदेशाची 
घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका  सर्वोच्च  न्यायालयात दाखल  केली आहे. या 
याचिकेत  म्हटले  आहे  की  केंद्रीय गृहमंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले सरकारी
आदेश बेकायदेशीर, असंवैधानिक आणि  भारतीय  घटनेच्या  कलम  १४ आणि १९ चे उल्लंघन 
करतात.

"SC to hear opposing PILs on termination
 and slashing of employees' salary during
 lockdown
 टाइम्स ऑफ इंडिया 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

किमान वेतन कसे काढावे? २०२४ विशेष भत्ता ,मूळ वेतन

२०२४ सुधारीत विशेष भत्त्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र /DA/SPECIAL ALLOWANCE 2024

किमान वेतन " स्थानिक स्वराज्य संस्था " (ग्रामपंचायत वगळून)१.७.२०२४ ते ३१.१२.२०२४ ,MINIMUM WAGES LOCAL AUTHORITY (other than VILLAGE PANCHAYAT)

KAMGAR MITRAकिमान वेतन ग्रामपंचायत २०२४ इमेजेस/MINIMUM WAGES IMAGES

किमान वेतन ग्रामपंचायत नवीन सुधारीत विशेष भत्ता रु.४०३/- १.१.२०२१ ते ३०.६.२०२१

किमान वेतन प्लस डीए अतिरिक्त काय फेसीलीटी पगारात जमा होतात ? विविध भत्ते/ ALLOWANCES

How To calculate Minimum Wages in India.

किमान वेतन कारखाने २०२४ Maharashtra Minimum Wages 2024FACTORIES RESIDUAL (FACTORIES NOT COVERED UNDER SCHEDULE)

किमान वेतन २०२४ दुकाने व आस्थापना SHOP AND ESTABLISHMENT'S MINIMUM WAGES

किमान वेतन २०२४ डिसेंबर पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२४, विशेष भत्ता २०२४ NEW DA/SPECIAL ALLOWANCE 2024