किमान वेतन २०२४ इंजिनीरिंग सुधारीत विशेष भत्ता १७३६/- Maharashtra Minimum Wages 2024 ENGINEERING INDUSTRY
किमान वेतन अभियांत्रिकी उद्योग २०२४
Maharashtra Minimum Wages 2024
ENGINEERING INDUSTRY
किमान वेतन २०२४ डिसेंबर पर्यन्त सर्व ६७ अनुसूचित उद्योग, मूळ वेतन २०२४, विशेष भत्ता २०२४ येथे क्लिक करा
किमान वेतन अभियांत्रिकी उद्योग २०२०
Maharashtra Minimum Wages 2020 ENGINEERING INDUSTRY
* 1.1.2020 TO 30.6. 2020 ENGINEERING INDUSTRY SPECIAL ALLOWANCE 4,536 /-
** १.१.२०२० ते ३०.६.२०२० इंजिनीरिंग उद्योग किमान वेतन नवीन सुधारीत विशेष भत्ता ४,५३६/-
किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी (कामगार उपयुक्त, कामगार विभाग , महाराष्ट्र शाषण ) यांचे द्वारा दर सहा महिन्यांनी विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र काढण्यात येते . १.१.२०२० ते ३०.६.२०२० या सहा महिन्यांकरिता विशेष भात्याची दर सूचनापत्रात दिले आहे .
'१.१.२०२० ते ३०.६.२०२० नवीन सुधारीत विशेष भत्ता' उजव्या बाजूस निळ्या अक्षरात लिहिले आहे त्यावर क्लिक करा.
एखाद्या अनुसूचित उद्योगा करीता विशेष भत्ता हा तिन्ही परिमंडळासाठी एकच राहतो जेंव्हा कि त्या उद्योगासाठीचे मूळ वेतन हे प्रत्येक परिमंडळासाठी वेगवेगळे असतात. इंजिनीरिंग उद्योग विशेष भात्याची दर रक्कम ४५३६/- प्रति महिना दिली आहे.
किमान वेतन = मूळ वेतन +विशेष भत्ता
किमान वेतन हे मूळ वेतन व विशेष भत्ता जोडून काढलेली रक्कम आहे . किमान वेतन प्रति महिना काढल्या जातो . यास आपल्याला प्रति दिवस काढायचे असल्यास एकूण किमान वेतनास २६( कामाचे दिवस ) ने भागावे. उदाहरणार्थ, परिमंडळ ३ भागातील अकुशल इंजिनीरिंग उद्योग कामगाराचे किमान वेतन जानेवारी २०२० मध्ये नवीन विशेष भत्ता (२०२०) अनुसार १०,५३६ रुपये महिना आहे . तर त्याचे प्रति दिवस पगार १०,५३६ ÷ २६ = ४०५.२३ रुपय प्रति दिवस एवढे राहील. प्रति दिवस पगार ४०५.२३ /- यास ८ (प्रति दिवस ८ तास काम ) ने भागल्यास प्रति तास पगार काढता येतो . या उदा. ४०५.२३ ÷ ८ = ५०. ६५ /- एवढे प्रति तास पगार राहील.
* विशेष भत्ता(Special Allowance) यास डेअरनेस ऑलॉव्हन्स (Dearness Allowance-DA ) किंवा महागाई भत्ता देखील म्हणतात. परिमंडळ १, २ , ३ याची माहिती दस्तावेज क्र. २ महाराष्ट्र शाषण राजपत्र यात दिलेली आहे . तसेच कुशल , अर्धकुशल व अकुशल कामगार म्हणजे काय ? याबाबत देखील महाराष्ट्र शाषण राजपत्र यात नमूद केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा